-->
संकेत हुमणे विद्युत सहाय्यक यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गराडा बुज व मेंढा येथील विद्यार्थ्यांना दिल्या शालेय भेटवस्तू.

संकेत हुमणे विद्युत सहाय्यक यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गराडा बुज व मेंढा येथील विद्यार्थ्यांना दिल्या शालेय भेटवस्तू.


संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज"

भंडारा :- तालुक्यातील -गराडा बुज येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील विद्यार्थी आणि दहावी बारावीच्या प्राविण्य विद्यार्थीना त्यांच्या यशाबद्दल कौतुकाची थाप मिळावी व अशाकार्यामुळे त्यांना उज्वल भविष्यासाठी प्रेरणा मिळावी या उदात्त हेतूने स्मृती. मंजुषाबाई पतिरामजी हुमणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गराडा बुज येथील विद्यार्थ्यांना व दहावी आणि बारावीच्या परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार श्री.संकेत हुमणे यांच्या हस्ते सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय बॅग देऊन सत्कार करण्यात आले. यामध्ये वर्ग बारावी मध्ये कुमारी सिमरण गणेश जगनाडे व इयत्ता १० वी तील विद्यार्थीनी कुमारी. रोशनी राजु सार्वे या गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात येवून पुढील शैक्षणिक वाटचालीस संकेत हुमणे यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले. गावची शाळा टिकविण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे, आपले मुले मुली जिल्हा परिषद शाळेमध्येच शिकविली पाहिजे, गावची शाळा बंद पडल्यास गरीब विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण बाहेरगावी घेणे किती कठीण होईल म्हणून त्यामुळे आपल्या गावची जिल्हा परिषद शाळा वाचण्यासाठी प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे जेणेकरून भविष्यात कोणीही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही. तसेच शाळेचा विकास हाच गावाचा विकास यासाठी ग्रामपंचायतने शाळेसाठी लागणाऱ्या सुविधा विविध योजनेमधून पूर्ण कराव्यात असे मनोगत संकेत हुमणे यांनी व्यक्त केले.तसेच कुमारी पायल चव्हाण हिने सुद्धा जिल्हा परिषद शाळेला शैक्षणिक साहित्य भेट दिले. 
याप्रसंगी गराडा बुजचे सरपंच मंगला चव्हाण, उपसरपंच निलिमा गाढवे, माजी पं. समिती सदस्य परसराम देशमुख, विक्की मेश्राम, साहिल हुमणे, मंगेश गाढवे, तुषार गजभिये, नितेश गोंडाणे मालता चव्हाण, रंजूबाई गवरे, रमा चव्हाण, प्रमोद गाढवे शालेय समिती अध्यक्ष, संदिप बावनकुळे, गौरव लांजेवार, सौरभ गाढवे, सौरभ चव्हाण , संदिप गाढवे, धिरज चव्हाण, साहिल भोयर, अजय मेश्राम, गिरिश मेश्राम, हे सर्व उपस्थित होते.

0 Response to "संकेत हुमणे विद्युत सहाय्यक यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गराडा बुज व मेंढा येथील विद्यार्थ्यांना दिल्या शालेय भेटवस्तू. "

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article