सत्य घटना वर आधारित कविता
गुरुवार, 2 जुलाई 2026
Comment
"खरा न्याय कर देवा"
होते मंदिरात चोरी
तुले देवं कसा म्हणू
तुचं ब्रह्मांड नायक
सांग कसा तुले मानू !!
तुह्या घरासाठी रामा
काय काय नाही केलं
कोर्ट कचेरी लढाई
लई बलिदान झालं !!
देवं जळी काष्टी पाषानी
सांगत होतो वानू वानू
तुचं ब्रह्मांड नायक
सांग कसा तुले मानू !!
ईट ईट जमा केली
बांधलं तुह्य मंदिर
लाठी,काठी,गोळीबार
झेलले छातीत खंजीर !!
सुरक्षा, सेवेसाठी रामा
लक्ष्मण कोठून आणू
तुचं ब्रह्मांड नायक
सांग कसा तुले मानू !!
प्राण प्रतिष्ठा केली ज्यांनी
रामा त्यांनी तुले लुटलं
खरं सांग देवा तुह्यच
नशीब काहून फुटलं !!
कसे नाहीत दिसले
लवकुश अवी टिनू
तुचं ब्रह्मांड नायक
सांग कसा तुले मानू !!
तुचं सांग कसं टाकू
दानं मंदिराच्या पेटीत
खावून खावून दानं
होती काही गुटगुटीत !!
खरा न्याय कर देवा
सांगतोय ठानू ठानू
तुचं ब्रह्मांड नायक
सांग कसा तुले मानू !!..
लेखक✍️
वासुदेव महादेवराव खोपडे
सहा. पोलीस उपनिरीक्षक(सेनि)
अकोला 9923488556.
0 Response to "सत्य घटना वर आधारित कविता"
एक टिप्पणी भेजें