रवी दलाल यांच्या निवडक कथा सामाजिक भान जपणाऱ्या - ई. झेड.खोब्रागडे.
मंगलवार, 7 जुलाई 2026
Comment
अविनाश गोंडाणे
९९२३२६४१९३
"साप्ताहिक जनता की आवाज"
अमरावती :- समाजव्यवस्थेने नाकारलेला शेवटच्या घटकांतील माणूस रवी दलाल यांच्या कथेचा केंद्रबिंदू असून त्यांच्या कथा सामाजिक भान जपणाऱ्या आहेत असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यांनी केले, ते नागपूर येथे विभूतीचंद्र गजभिये संपादित रवी दलाल यांच्या निवडक कथा या कथासंग्रहाचे प्रकाशन सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
बोलताना पुढे खोब्रागडे म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीत साहित्यिकांनी संविधानवादी भूमिका घेऊन आपले कर्तव्य म्हणून समोर आणले पाहिजे, रवी दलाल यांच्या कथेने उपेक्षित माणसांचा आवाज बुलंद केला आहे.रवी दलाल यांच्या निवडक कथा शिर्षक असलेला कथासंग्रह विभूतीचंद्र गजभिये यांनी पुस्तक रुपाने प्रकाशित केला. सदर प्रकाशन सोहळा डॉ बाबासाहेब आंबेडकर मिशन सभागृह,लष्करीबाग नागपूर येथे आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी सनदी अधिकारी ई झेड खोब्रागडे होते तर उद्घाटक म्हणून मा.डॉ लालसिंग मिसाळ होते. मंचकावर प्रसिद्ध कथाकार डॉ रवी दलाल,
मा बाळासाहेब काळे, (निवृत्त उपसंचालक भूमिअभिलेख पुणे), मा अशोक सरस्वती (प्रबोधनकार ),रामभाऊ डोंगरे ,(महाअंनिस),विकास राऊत,(अक्षरशिल्प प्रकाशन अमरावती), प्रा वीरेन्द्रबाबू इंगळे (पथदर्शक साहित्य मंच काटोल),डॉ भन्ते अभयनायक डॉ कृष्णकांत डोंगरे व लेखक विभूतिचंद्र गजभिये इत्यादी मान्यवर विराजमान होते.मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या छायाचित्रांना हार अर्पण द्वीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.शोभा पाटील यांनी संविधान उद्देशीकेचे वाचन केले तर पथदर्शक साहित्य मंचाचे उपाध्यक्ष मा.विरेंद्रबाबू इंगळे यांनी कार्यक्रमाची सविस्तर प्रस्तावना ठेवली. त्यानंतर माजी सनदी अधिकारी मा.ई झेड खोब्रागडे व मान्यवरांच्या हस्ते.
रवी दलाल यांच्या निवडक कथा या कथासंग्रहाचे विमोचन करण्यात आले. या प्रसंगी बोलताना कथाकार डॉ रवी दलाल म्हणाले की माझ्या निवडक कथां संपादित करून विभूतीचंद्र गजभिये यांनी यांच्यातील सामाजिक जाणीवेची तळमळ उजागर केली आहे. तीस वर्षा पासून माझ्या कथा-मासिक दिवाळीअंक साप्ताहिक पेपर मध्ये विखुरलेल्या होत्या. त्या एकत्रीत करने खरोखर अवघडच काम होतं.
तरी विभुतीचंद्र गजभिये यांनी कथा एकत्रीत करून वाचकांच्या पुढे नव्या स्वरूपात दर्जेदार कथासंग्रह ठेवला आहे. साहित्य क्षेत्रांत मी पाहिल बरेच लेखक हे पैसा प्रसिद्धी आणि ओळखीच्या लिफ्टने वर जातात पण लेखक विभुतीचंद्र गजभिये यांनी अनेक पायऱ्या चढून ही प्रसिद्धी गाठली आहे
यांनी लिहिलेल्या कथा लेख कविता नेहमीच वर्तमानपत्र मासिक मधुन प्रकाशित होतात. त्यांच्या गतीमान लेखणीची दखल घेवून वेस्टबंगाल सरकारने स्वामी विवेकानंद प्राइड अचीवर अवार्ड पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे. प्रसिद्ध किर्तनकार अशोकभाऊ सरस्वती म्हणाले की विभूतीचंद्र गजभिये व रवी दलाल या दोघांना मी त्यांच्या बालपणापासूनच ओळखतो.त्यापैकी विभुतीचंद्र गजभिये ते शोषित वंचितांच्या मदतीला धावून जाणारे त्यागमयी व्यक्तित्त्व असुन साहित्य क्षेत्रांत घेतलेली भरारी आश्चर्यजन आहे सर्व वक्त्यांच्या भाषणाचा मागोवा घेत अध्यक्ष ई झेड खोब्रागडे यांनी आपले विचार मांडले.
परिवर्तनवादाची कास धरुन सामाजिक धार्मिक जागृती निर्माण करणार्या रवी दलाल यांच्या कथा अन्नाभाऊ साठेच्या कथे इतक्याच सक्षम आहेत यांत शंका नाहीं. रवी दलाल यांच्या कथा वाचा नंतरच कथेतील ताकद वाचकांना माहीत पडेल.रवी दलाल यांच्या कथा संकलित करून विभूतीचंद्र गजभिये यांनी साहित्य क्षेत्रात परिवर्तनाची पताका रोवली आहे.या प्रसंगी उत्तर देतांना लेखक विभूतीचंद्र म्हणाले की साहित्य हे समाजाचा आरसा आहे.सामाजिक धार्मिक घडामोडीच दर्शन करण्याची जबाबदारी जागृत लेखकाची असते तेच काम मी केले आहे हे जानिव रवी दलाल मला रवी दलाल यांनी करून दिली म्हणून रवी दलाल हे साहित्य क्षेत्रांतील गुरू आहेत हे कार्य मी केवळ माझ्या सहचारिणी दर्शना मुळेच करू शकलो.
या यशस्वीतेचे श्रेय माझ्या पत्नीला जाते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी सागर भवते यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राचार्य वसंत वावरे यांनी केले. कार्यक्रमाला- देवानंद बडगे चित्तरंजन चौरे, नरेश महाजन ,प्रा.पुष्पा घोडके, शोभा पाटील, नंदा भगत दीप्ती नाईक, अर्चना राडे, भोला सरवर, आनंद मेश्राम, सुनीता रमेश ढवळे,वर्षा सहारे,सौ वर्षा टेंभेकर, डॉ सुनील भगत, विजय गवई.निलेश खोब्रागडे. सुरेश खडसे.अरुण ठवकर. दिलीप पाटील दिनेश वाघमारे.प्रफुल्ल नारडवार श्रीपाद गोरे बहुजन हिताय संघ, कृती समिती भूमिअभिलेख कर्मचारी संघटना कार्यकर्ते, कास्ट्राईब भूमिअभिलेख कर्मचारी संघटना व बराच मोठा मित्र परिवार उपस्थित होता.
0 Response to "रवी दलाल यांच्या निवडक कथा सामाजिक भान जपणाऱ्या - ई. झेड.खोब्रागडे."
एक टिप्पणी भेजें