भातकुली तालुक्यात माझे गाव आरोग्य संपन्न गाव तालुकास्तरीय कृती समितीची बैठक संपन्न.
सोमवार, 6 जुलाई 2026
Comment
अविनाश गोंडाणे
"साप्ताहिक जनता की आवाज"
अमरावती (वि.प्र.) :- भातकुली तालुक्यामध्ये माझे गाव आरोग्य संपन्न गाव अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी' तालुकास्तरीय कृती दल' समितीची बैठक समग्र शिक्षा अभियान हॉल पंचायत समिती भातकुली येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडली. या बैठकीमध्ये अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी माननीय तृप्ती दुरुगकर, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रवीण वानखेडे , समितीच्या सचिव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्वेता सालफळे , बाल विकास प्रकल्प अधिकारी श्री नारायण टेरे आणि इतर सदस्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण खराटे ,डॉ. महेंद्र मेश्राम ,डॉ. निखिल उपलवार, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. सोनाली देशमुख तसेच विस्तार अधिकारी पंचायत निलेश भुयार , आरोग्य सहाय्यक निशांत सरप, वाघमारे त्याच प्रकारे सर्व ग्राम विकास अधिकारी, बाल विकास प्रकल्प सुपरवायझर इत्यादी सदस्य सभेला उपस्थित होते.
सर्वप्रथम तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्वेता सालफळे यांनी अभियानाची उद्दिष्टे प्रत्येक महिन्यानुसार करायचे आरोग्यविषयक उपक्रम त्याच प्रकारे भातकुली तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला "बेसलाईन असेसमेंट "मध्ये मिळालेले स्कोर इत्यादीचे वाचन केले. त्यानंतर डॉ. प्रवीण खराटे आणि डॉ. सोनाली देशमुख यांनी ग्राम स्तरावरील नियोजन कशा प्रकारे करावे त्याच प्रकारे अंतर विभागीय समन्वय साधून अभियान यशस्वी कसे करता येईल याविषयी विस्तृत चर्चा केली .या अभियान अंतर्गत मिळणारे राज्यस्तरीय ,विभाग स्तरीय व जिल्हास्तरीय पुरस्कार , तालुकास्तरीय पुरस्कार याविषयी विस्तृत माहिती देण्यात आली बेसलाईन असेसमेंट स्कोर 70 असलेल्या सर्व ग्रामपंचायत या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात हे समजावून सांगण्यात आले तसेच ज्या तालुक्यात सरासरी जास्त ग्रामपंचायतला ७० पेक्षा जास्त स्कोर असेल त्या पंचायत समितीला ही पुरस्कार मिळेल त्याच प्रकारे केवळ संस्थाच नव्हे तर तेथे काम करणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांना ही सन्मानपत्र व पुरस्कार मिळेल हे समजून सांगण्यात आले.
माननीय गटविकास अधिकारी तृप्ती दुरुगकर मॅडम यांनी सर्व अभियानाचा आढावा घेतला व सर्व ग्रामपंचायत अधिकारी यांना उत्साह पूर्ण व सहकार्याची भावना ठेवून "ॲक्शन प्लॅन " करण्यास सांगितले व आपल्या स्कोरिंग वाढविण्यासाठी आरोग्य व पंचायत विभागाने कार्य करावे असे सुचित केले. सहाय्यक गटविकास अधिकारी श्री प्रवीण वानखेडे साहेब यांनी सर्व इतर कामांसोबत आरोग्य विषयक अभियान पुरस्काराला सुद्धा ग्रामपंचायतीने प्राधान्य द्यावे असे सूचना दिल्या व आपण पंचायत समितीला कसे समोर नेऊ शकतो यासाठी प्रयत्नशील असावे असे संबोधित केले
यावेळी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करून भातकुली तालुक्यातील प्रत्येक गाव आरोग्य संपन्न करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्याच प्रकारे प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये दर महिन्याला कृती समितीचे मीटिंग घेण्याचे मान्य करण्यात आले.
0 Response to "भातकुली तालुक्यात माझे गाव आरोग्य संपन्न गाव तालुकास्तरीय कृती समितीची बैठक संपन्न."
एक टिप्पणी भेजें