-->
 मोहाडी येथील तक्रार कर्त्याला न्याय कधी मिळणार.

मोहाडी येथील तक्रार कर्त्याला न्याय कधी मिळणार.


पियुष फर्निचर मालक भगवान पुडके यांच्या दुकानातून २ महिन्यापूर्वी 75000 ची चोरी 

आरोपी सीसीटीव्ही कॅमेरात कैद आरोपी अजूनही फरार 
मोहाडी पोलीस स्टेशनचे दुर्लक्ष 

पत्रकार संजीव भांबोरे यांनी प्रत्यक्ष मोहाडी पोलीस स्टेशनला भेट देऊन दूरध्वनी द्वारे ठाणेदार सुरेंद्र बेलखेडे यांच्याशी केली चर्चा.. 

           संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

भंडारा - मोहाडी पोलीस स्टेशन हद्दीत पियुष फर्निचर या नावाने दुकान असून दुकान असून ही दुकान 2011 पासून सुरू आहे. मालक भगवान पुडके असून यांच्या दुकानातून दिनांक 27/ 4 /2026 ला पहाटे ४ वाजेच्या जवळपास 75 हजार रुपयाची चोरी झाली. आरोपी सीसी टीव्ही फुटेज मध्ये दिसत आहेत .परंतु आज २ महिन्याचा कालावधी उलटला परंतु मोहाडी पोलिसांचे तपासाच्या दिशेने चक्र फिरताना दिसत नाही.दुकान ते पोलीस पोलीस स्टेशन अंतर हे १ किलोमीटरच्या आत असून अजून पर्यंत पियुष फर्निचर चे मालक भगवान पुडके यांना न्याय मिळालेला नाही. याबाबत आज दिनांक ८ जुलै 20 26 ला पत्रकार संजीव भांबोरे यांनी मोहाडी पोलीस स्टेशनला 10 वाजून 49 मिनिटांनी प्रत्येक भेट देऊन ठाणेदार सुरेंद्र बेलखेडे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली असता सदर प्रकरणाबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की आंधळगाव पोलीस स्टेशन व मोहाडी पोलीस स्टेशन अंतर्गत चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सदर प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. सदर चोरी प्रकरणात भंडारा जिल्ह्याचे लक्ष लागले असून मोहाडी पोलीस स्टेशन आरोपीला ताब्यात घेण्यात किती दिवस अजून लावते याकडे मोहाडी तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून आहे.

0 Response to " मोहाडी येथील तक्रार कर्त्याला न्याय कधी मिळणार."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article