-->
पातुर तहसील येथे विवरा (खरड) समशान भूमी जवळ अवैद्य गौण खनिज चोरीमुळे महसूल विभागचा,लाखो रुपयाचे नुकसान.

पातुर तहसील येथे विवरा (खरड) समशान भूमी जवळ अवैद्य गौण खनिज चोरीमुळे महसूल विभागचा,लाखो रुपयाचे नुकसान.

 


         गुलाब अंभोरे 
साप्ताहिक जनता की आवाज 

अकोला :- पातुर तहसील कार्यालय अंतर्गत येत असलेले विवरा ( खरड) स्मशानभूमीच्या आसपास महसूल विभाग चा लाखो रुपयांचे नुकसान झाले. अवैद्य , बिना रॉयल्टी, चे उत्खनन करून मुरूम जेसीबीने मोठमोठे खड्डे करून मुरूम चा उपसा केला. गावात तलाठी रवी पाली आज पर्यंत कार्यरत होते .आता पंधरा दिवसापासून तलाठी विलास गवई हे रुजू झाले असे तलाठी पाली यांनी सांगितले .परंतु गावात तलाठी असताना रात्रंदिवस मुरूम ट्रॅक्टरने काही देवाणघेवाण करून त्याकडे दुर्लक्ष करून लाखो रुपयांचा महसूल ची हानी झाली. काही खड्डे सतत दोन महिन्यांचे आहेत तर काही खड्डे आठ ते दहा दिवसांचे आहेत .गावकऱ्यांनी तहसील कार्यालय पातुर येथे मुरूम चोरी गेला अशी तक्रार दिली असता. तहसीलदार राहुल वानखडे साहेब यांनी पंचनामा व मोका पाहणी साठी प्रोबेशनरी तहसीलदार खंडारे साहेब यांना पाठवले आता, तक्रारदारांना न कळविता गुपचूप चोरून मंडळ अधिकारी , कोतवाल, तलाठी गवई, असे लोक होते असे समजले. तक्रारदाराला न कळविता किती खड्डे आहे कोणत्या ठिकाणी आहे हे न समजता थातूरमातूर घाईगडबडणे निघून गेलेत जेव्हा तक्रार करता तहसीलदार राहुल वानखडे यांना तक्रारदाराला का बोलावले नाही असे विचारले असता त्यावर तहसीलदार राहुल वानखेडे म्हणतात जा माझी तक्रार करा यावर असे वाटते की शासकीय नोकरीवाले हे तर जनतेचे नोकर आहेत .जनतेचे काम करण्यासाठी त्यांना पगार देऊन शासनाने तिथे बसविले आहे .परंतु हे कोणाच्या जोरावर बोलतात . का , सर्वांचीच मिली भगत आहे. यामध्ये पाच ते सहा मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत .असे अंदाजी 700 ब्रास मुरूम गेलेला आहे यापुढील तक्रार करता तात्काळ जिल्हाधिकारी साहेब अकोला यांच्याकडे धावा घेणार अशी शक्यता आहे. दबंग, निर्भीड, निस्वार्थी, पत्रकार - गुलाब भाऊ अंभोरे.

0 Response to "पातुर तहसील येथे विवरा (खरड) समशान भूमी जवळ अवैद्य गौण खनिज चोरीमुळे महसूल विभागचा,लाखो रुपयाचे नुकसान."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article