साहित्य ज्वाला (कविता)
रविवार, 26 जुलाई 2026
Comment
संकलन,
पत्रकार/प्रबोधनकार
प्रदीप कडबे रामटेक.
मानवतेचा झेंडा.
बाबासाहेबांनी जगी लावीला आहे.
मानवतेचा झेंडा
जोवरी नभात सूर्य तळपत राहील.
जगी मानवतेचा झेंडा डौलाने,
फडकतच राहील =1=
सर्व महासागराचे पाणी हळूहळू
आटत जाईल,
पण बाबासाहेबांची किर्ती
जगी सर्वदूर वाढतच जाईल =2=
जगात वादळे येतील जातील,
प्रलय होऊनिया शांत होतील.
परी बाबासाहेबांनी लावलेला,
ज्ञानाचा दिवा जगी तेवतच राहील =3=
आकाशात चंद्र तारे ,
चमकत राहतील.
विश्वामध्ये परिवर्तने होतील जातील
बाबासाहेबांच्या ज्ञानाचा प्रकाश
धरतीवर पसरतच जाईल =4=
कवी-नागनाथ डोलारे
जेष्ठ साहित्यिक, पनवेल.
0 Response to "साहित्य ज्वाला (कविता) "
एक टिप्पणी भेजें