-->
भंडाऱ्यात आज प्रथमच विदर्भातील ५०० हून अधिक पत्रकारांची उपस्थिती; "पत्रकार हक्क परिषद" आयोजन.

भंडाऱ्यात आज प्रथमच विदर्भातील ५०० हून अधिक पत्रकारांची उपस्थिती; "पत्रकार हक्क परिषद" आयोजन.


• व्हॉइस ऑफ मीडिया चे संस्थापक संदीप काळे तथा राष्ट्रीय अध्यक्ष अनिल मस्के उपस्थित राहणार

           नरेंद्र मेश्राम 
"साप्ताहिक जनता की आवाज"
 
भंडारा (प्रतिनिधी) : पत्रकारांच्या संरक्षण, हक्क आणि न्यायासाठी कार्यरत असलेल्या व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने रविवारी (दि. १२ जुलै) दुपारी १ वाजता भंडारा येथील पोलीस बहुउद्देशीय सभागृहात "पत्रकार हक्क परिषद" व विविध गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेसाठी विदर्भातील ५०० हून अधिक पत्रकार उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

या परिषदेला विविध क्षेत्रांतील मान्यवर, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी तसेच सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक व केंद्रीय अध्यक्ष संदीप काळे उपस्थित राहतील. याशिवाय व्हॉइस ऑफ मीडिया राष्ट्रीय अध्यक्ष अनिल मसके, राज्य संचालक किशोर करंजेकर, कार्याध्यक्ष नरेंद्र देशमुख, विदर्भ विभागाध्यक्ष व्यंकटेश दुडमवार आणि गडचिरोली जिल्ह्याचे प्रवक्ते नसिर हाशमी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

विशेष अतिथी म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, उद्योजक जयंत गज्जर, जॅकी रावलानी, डिम्पल मल्होत्रा, रूपेश टांगले तसेच विशेष निमंत्रित म्हणून जिल्हाधिकारी सावन कुमार आणि जिल्हा पोलीस अधीक्षक नुरूल हसन उपस्थित राहणार आहेत.

सायंकाळी ४ वाजता आयोजित गौरव सोहळ्यात देशसेवेसाठी योगदान देणाऱ्या माजी सैनिकांचा तसेच पत्रकारांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला पालकमंत्री पंकज भोयर, खासदार डॉ. प्रशांत पडोळे, आमदार डॉ. परिणय फुके, अविनाश ब्राह्मणकर, नरेंद्र भोंडेकर, नाना पटोले, राजू कारेमोरे, जिल्हा परिषद अध्यक्षा कविता उईके, माजी खासदार सुनील मेंढे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ फेंडर, नाना पंचबुद्धे, माजी आमदार चरण वाघमारे, तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

याशिवाय उपस्थितांसाठी बॉलिवूड गायिका राधा खुळे आणि प्रणय सतलज यांच्या "पाटलांचा बैलगाडा" या संगीतमय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या भव्य कार्यक्रमास पत्रकार, माजी सैनिक, विविध क्षेत्रांतील मान्यवर तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन व्हॉईस ऑफ मीडिया भंडारा जिल्हाध्यक्ष शशिकांत भोयर यांनी केले आहे.

0 Response to "भंडाऱ्यात आज प्रथमच विदर्भातील ५०० हून अधिक पत्रकारांची उपस्थिती; "पत्रकार हक्क परिषद" आयोजन."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article