स्टेशन चानी हद्दीत नवीन ठाणेदार यांच्या आशीर्वादाने अवैध धंद्याला माज आला.
गुरुवार, 16 जुलाई 2026
Comment
गुलाब भाऊ अंभोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
पातुर :- तालुक्यातील पोलीस स्टेशन चानी अंतर्गत असलेल्या गावांमध्ये दोन नंबरचे अवैध धंद्याला चांगलाच माज आलेला आहे. असे आरोप सामाजिक कार्यकर्ता निलेश कापकर आणि महिला तसेच नागरी यांनी केलेले आहे.
बऱ्याच गावातील महिलांच्या अवैध धंद्याबद्दल तक्रारी आहेत .नवेगाव, उंबरवाडीया परिसरामध्ये गावठी दारू ची विक्री खूप जोरात होत आहे .यामध्ये लहान लहान मुलं सुद्धा वाईट मार्गावर लागतात. याचबरोबर खुलेआम वरली मटका , जुगार, टेबल वरली ,अवैध गुटखा, अवैध पेट्रोल विकणे . चानी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू आहेत .महिला मंडळांनी चानीचे ठाणेदारांना तक्रारी दिल्या परंतु त्यांचे हप्ते सुरू असल्यामुळे ते बंद होऊ शकत नाही .म्हणून या गोष्टीकडे ठाणेदार यांनी दुर्लक्ष केलेले आहे .चानी ला नवीनच रुजू झालेले यांनी तातडीने २ नंबर चे अवैध धंदे करणाऱ्या या लोकांची बैठक घेऊन हप्ते वसूल केले असे आरोप नागरिकांनी केलेले आहेत. आलेगाव मळसुर चानी इत्यादी ठिकाणी वरली मटका झपाट्याने सुरू आहे. हल्ली दोन नंबरचे धंदे करणाऱ्यांची ये - जा सुरू असते. असे नागरिकांनी आरोप केले सामाजिक कार्यकर्ता निलेश कापकर आणि महिला मंडळ यांनी पोलीस अधीक्षक अकोला, जिल्हाधिकारी अकोला, पोलीस स्टेशन चानी ठाणेदार यांना निवेदन दिलेली आहेत. परंतु अजून धंदे बंद झाले नाहीत. परंतु धंदे बंद झाल्या सामाजिक कार्यकर्ता आणि महिला मंडळांनी सांगितले की जोपर्यंत ठाणेदार निलंबित होत नाही, तोपर्यंत आमचे उपोषण पोलीस स्टेशनला सुरू राहील असा इशारा नागरिकांनी दिला.
0 Response to "स्टेशन चानी हद्दीत नवीन ठाणेदार यांच्या आशीर्वादाने अवैध धंद्याला माज आला. "
एक टिप्पणी भेजें