-->
ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे सरकारी साहित्य जळाले; लाखो रुपयांच्या नुकसानीची शक्यता.

ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे सरकारी साहित्य जळाले; लाखो रुपयांच्या नुकसानीची शक्यता.



          सोनू संजीव क्षेत्रे 
"साप्ताहिक जनता की आवाज"

उल्हासनगर/कुर्ला कॅम्प प्रतिनिधी :- कुर्ला कॅम्प येथील शिव मंदिर रोड परिसरातील महाराष्ट्र प्राधिकरणाच्या मोकळ्या भूखंडावर मलनिस्सारण विभागामार्फत नवीन ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी वापरण्यात येणारे मोठ्या आकाराचे ड्रेनेज पाईप संबंधित ठेकेदाराने मोकळ्या जागेत ठेवले होते.

मात्र, आज सकाळी स्थानिक नागरिकांना हे सर्व पाईप पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत आढळून आले. या घटनेमुळे सरकारी मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त केली जात असून, संबंधित ठेकेदाराच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

या घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते नियाझ अन्सारी आणि प्रशांत चंदनशिव यांनी तातडीने सिटी प्रोजेक्ट ऑफिसर पंकज जाधव यांना दूरध्वनीद्वारे दिली. या घटनेची चौकशी करून नुकसानास जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच सरकारी निधीचा होणारा अपव्यय रोखावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

सरकारी कामांमध्ये वापरण्यात येणारे साहित्य योग्य सुरक्षा व्यवस्थेशिवाय उघड्यावर ठेवले जात असल्याने अशा घटना घडत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. संबंधित विभागाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

0 Response to "ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे सरकारी साहित्य जळाले; लाखो रुपयांच्या नुकसानीची शक्यता."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article