मुख्य संपादक शेख आरीफ निमटेककर यांना दिल्ली येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नॅशनल फेलोशिप पुरस्कार जाहीर.
मंगलवार, 21 जुलाई 2026
Comment
प्रदीप कडबे
"साप्ताहिक जनता की आवाज"
नांदेड :- जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील निमटेक येथील महाराष्ट्र 24 मराठी न्यूजचे मुख्य संपादक शेख आरीफ निमटेककर यांची भारतीय दलित साहित्य अकादमी, नवी दिल्ली यांच्या वतीने प्रदान करण्यात येणाऱ्या "डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल फेलोशिप अवॉर्ड – 2026" साठी निवड करण्यात आली आहे.अकादमीने पाठविलेल्या पत्रानुसार हा प्रतिष्ठेचा पुरस्कार 12 ते 13 डिसेंबर 2026 रोजी नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय अधिवेशनात प्रदान करण्यात येणार आहे.
शेख आरीफ निमटेककर यांच्या पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याची ही दखल घेतली असून करीता त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या निवडीबद्दल सामाजीक,पत्रकार,साहित्यिक क्षेत्रात सर्वत्र विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.करीता पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!..
0 Response to "मुख्य संपादक शेख आरीफ निमटेककर यांना दिल्ली येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नॅशनल फेलोशिप पुरस्कार जाहीर."
एक टिप्पणी भेजें