-->
तुमचा सफाई कर्मचाऱ्यांच्या आंदोलन..

तुमचा सफाई कर्मचाऱ्यांच्या आंदोलन..

• ६० कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण : मुख्याधिकाऱ्यांच्या वाहनाला घेराव, चर्चा निष्फळ.

        दिगंबर देशभ्रतार 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

तुमसर :- मागील दहा दिवसांपासून कामबंद आंदोलनावर असलेल्या तुमसर नगरपरिषदेतील ६० कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी अखेर शुक्रवारी १० जुलै रोजी नगरपरिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषण सुरू करून प्रशासना विरोधात आंदोलन पुकारला. 

दोन महिन्यांपासून वेतन थकीत, किमान वेतनाचा लाभ नाही, तसेच सुरक्षेसाठी आवश्यक मूलभूत साहित्याचा पुरवठाही होत नसल्याचा गंभीर आरोप करत कामगारांनी प्रशासनाला थेट जबाबदार धरले आहे.शुक्रवारी सकाळी १०:३० वाजता सुरू झालेल्या उपोषणाला दिवसभर विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देत कामगारांना पाठिंबा दर्शविला. माजी खासदार मधुकर कुकडे, माजी आमदार चरण वाघमारे, नगरसेवक गुलराज कुंदवानी, रोशनी भोंडेकर, रेखा चकोले, नगरपरिषद उपाध्यक्ष सचिन बोपचे तसेच देवचंद ठाकरे यांनी पालिकेच्या प्रवेशद्वारावर संपात सहभागी सफाई कर्मचारी.उपोषणस्थळी भेट देऊन कामगारांच्या मागण्या ऐकून घेतल्या.

दरम्यान, दुपारी साडेतीनच्या सुमारास प्रभारी मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांच्या वाहनाला उपोषणकर्त्या सफाई कर्मचाऱ्यांनी घेराव घालत तीव्र संताप व्यक्त केला. परिस्थिती चिघळत असल्याचे लक्षात येताच नगराध्यक्ष सागर गभणे यांनी कामगारांशी चर्चा केली. मात्र कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने कामगारांनी आमरण उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

 कंत्राटी कामगारांच्या मागण्या!..

कामगारांचे म्हणणे आहे की, किमान वेतन, वेळेवर पगार, हातमोजे, बूट, मास्क यांसारख्या सुरक्षासाहित्याचा पुरवठा आणि इतर मूलभूत सुविधा मिळत नसल्यामुळे उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

शहर स्वच्छ ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच न्यायासाठी उपोषण करावे लागत असल्याची शोकांतिका व्यक्त केली. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे परिस्थिती आणखी चिघळल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी नगरपरिषद प्रशासन व संबंधित कंत्राटदारावर राहील, असा इशाराही दिला आहे.

0 Response to "तुमचा सफाई कर्मचाऱ्यांच्या आंदोलन.."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article