-->
पवनी तालुक्यातील सुरबोडी गांव गेल्या तीन दशका पासून पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत.

पवनी तालुक्यातील सुरबोडी गांव गेल्या तीन दशका पासून पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत.



      दिगंबर देशभ्रतार 
साप्ताहिक जनता की आवाज
 
भंडारा-गोंदिया :- जिल्ह्यात असलेल्या पवनी तालुक्यातील सुरबोडी गावाला दिनांक ९ जुलै 2026 रोजी भंडारा चे जिल्हाधिकारी सावन कुमार यांची भेट. 
पवनी तालुक्यातील गोसीखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पामुळे बाधित झालेले सुरबोडी हे गाव. शासनाच्या दप्तर दिरंगाई मुळे या गावाचे आजपर्यंत पुनर्वसन झालेले नाही. 125 कुटुंब असलेल्या व 95 टक्के आदिवासी ( एसटी ) तसेच तीन बाजूने प्रकल्पाचा पाणी व चौथ्या बाजूने घनदाट जंगलाने वेढ
लेला हे सुरबोडी गाव. आपले पुनर्वसन होईल या आशेने अनेक संकटे झेलत जीवन जगत आहे. 
     गावातील 93% शेतजमीन गोसीखुर्द प्रकल्पाच्या जलाशयात बुडालेली आहे. शासनाने शेती संपादित करून अल्पसा चाळीस हजार रुपये प्रति एकर ‌मोबदला सुद्धा दिला. पर्यायी शेती न दिल्यामुळे व मिळालेले पैसे खर्च झाल्यामुळे उदरनिर्वाहाचा साधनच हरपला. गावात रोजगार नाही. पाच , दहा किलोमीटर वरील दुसऱ्या गावात जाऊन मोलमजुरी करून जीवन जगावं लागत आहे. गावात एकही 
दुकान नाही त्यामुळे चार ते पाच किलोमीटर अंतरावरील गावातूनच लागणाऱ्या वस्तू खरेदी करावे लागतात. गट- ग्रामपंचायत कार्यालय सुरबोडी गावापासून ५ किलोमीटर अंतरावर खापरी सौंदळ या पुनर्वसीत गावात आहे. गावाच्या सीमेतच प्रकल्पाच्या पाणी असल्यामुळे विषारी जलचर प्राण्यांचे गावातील प्रवेशामुळे भीती वाढलेली आहे. तर अड्याळ गावाकडे

 जाणाऱ्या रस्त्यावर नेहमीच वाघाचे दर्शन होत आहे. यापूर्वी वाघांनी गावातील शेळ्या व जनावरे यांची शिकार केलेली आहे. गावात चौथ्या वर्गापर्यंत एक शिक्षक असलेली शाळा आहे. पाचव्या वर्गातील मुलांना अड्याळ गावात शिकायला जावे लागते. गावात एसटी महामंडळाची बस येत नाही. सतत भीतीच वातावरण असतो. गावात पिण्याच्या पाण्यासाठी एकमेव सार्वजनिक विहीर आहे. पण नाग नदीच्या प्रदूषित पाण्यामुळे गोसे जलाशयातील पाणी प्रदूषित झालेले असून गावातील विहिरीचे सुद्धा पाणी प्रदूषित झालेले आहे. पाणी पिण्यास योग्य नाही पाण्याची चव बदललेली आहे. पण 
नायलजानी गावकरी याच पाण्याचा वापर करीत आहेत. 
       माननीय जिल्हाधिकारी सावन कुमार व त्यांच्यासोबत आलेले अधिकारी व कर्मचारी यांनी गावात येऊन प्रत्यक्ष भेट घेतली. संपूर्ण गाव पिंजून काढला. गावकऱ्यांची सभा घेतली. प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या गावाची भौगोलिक परिस्थिती बघितली. व प्रकल्पग्रस्तांना आश्वासित केले की तुम्हाला गावापासून पाच किलोमीटर अंतरावरील अड्याळ ते कोंढा या राज्य मार्गावर जागा शोधून तुमचं पुनर्वसन करण्यात येईल. आज पासूनच शासन गावाच्या पुनर्वसनासाठी 


जागेचा शोध व संपादनाच्या कार्यवाहीला सुरुवात करीत 
असल्याचे सांगितले. व तसे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
      या भेटीदरम्यान गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे संस्थापक संघटक चंद्रशेखर भिवगडे, संघर्ष समितीचे कार्यकर्ते राजेश आजबले, मनीषा भांडारकर, धनंजय मुलकलवार, रोशन भांडारकर, पूजा पाटील. 
खापरी ,सौंदळ ,सुरबोडी गट ग्रामपंचायत चे सरपंच मनोहर खंगार उपस्थित होते.

0 Response to "पवनी तालुक्यातील सुरबोडी गांव गेल्या तीन दशका पासून पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article