एकोडी येथे स्मृतिशेष प्रबोधनकार मनोजभाऊ कोटांगले यांचा प्रथमस्मृती दिन व गुरुशिष्य स्नेहमीलन सोहळा कार्यक्रमाचे १ ऑगस्ट ला आयोजन.
गुरुवार, 30 जुलाई 2026
Comment
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- महाराष्ट्रात प्रबोधनाची चळवळ सांगणारा अभ्यासू व्यक्तिमत्व स्मृतिशेष प्रबोधनकार मनोजभाऊ कोटांगले यांचा प्रथम स्मृती दिवस व गुरुशिष्य स्नेहमीलन सोहळा या कार्यक्रमाचे भव्यदिव्य आयोजन १ आगस्ट २०२६ शनिवार ला सुमेध बुद्ध विहार एकोडी येथे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमा मध्ये सकाळी 9 वाजता प्रसिद्ध आलेबेदर येथे वृक्ष पूजन, त्यानंतर एकोडी येथील वृक्ष पूजन, भिक्खू संघ भोजनदान, परित्राण, संगीतमय कार्यक्रम, श्रद्धांजली कार्यक्रम, गुरुशिष्य सत्कार सोहळा अस कार्यक्रमाचे स्वरूप असणार आहे.
या मध्ये सत्कार मूर्ती म्हणून राष्ट्रीय प्रबोधनकार प्रकशनाथ पाटणकर, अनिरुद्ध शेवाळे,मनोजराजा गोसावी, जेष्ठ बेंजोवादक कनय्या मेश्राम उपस्थित राहनार आहेत.
या कार्यक्रमात उदघाटक समाजकल्याण सभापती शीतलताई राऊत,अध्यक्ष ऍड.रामटेके भंडारा, विशेष अतिथी तहसीलदार निलेश कदम,पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर, सामाजिक चळवळीचे नेते परमानंद मेश्राम, पंचायत राज प्राचार्य अभय बन्सोड , सभापती डॉ.ललित हेमने, एकोडी सरपंच संजय खोब्रागडे, कवी सुभाष मानवटकर,जयंत देशपांडे सर्व ग्रामपंचायत कमिटी एकोडी यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
संगीतमय कार्यक्रमात महाराष्ट्र नावाजलेले गायक प्रबोधनकार, जेष्ठ वादक, कवी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाचे आयोजन मोहिनी मनोज कोटांगले, एकनाथ कोटांगले, मंगेश कोटांगले, भावेश कोटांगले, संदिप कोटांगले, तेजस कोटांगले व समस्त कोटांगले परिवार यांनी केलेले आहे.
0 Response to "एकोडी येथे स्मृतिशेष प्रबोधनकार मनोजभाऊ कोटांगले यांचा प्रथमस्मृती दिन व गुरुशिष्य स्नेहमीलन सोहळा कार्यक्रमाचे १ ऑगस्ट ला आयोजन."
एक टिप्पणी भेजें