-->
काव्य..ज्वाला !..

काव्य..ज्वाला !..



संकलन :- लोकशाहीर प्रदिप कडबे (प्रबोधनकार)

भिमा तुझ्या मुळे

भीमा तुझ्यामुळे मी 
       माणूस आज आहे 
तुझ्या मुळे मला 
         जगात मान आहे !!१!!
तुझ्या कृपेने आता 
       आलबेल सारे आहे 
तुझ्या ज्ञानाचा प्रकाश 
        जगात पसरला आहे !!२!!
आता मला कुणाची 
       वाटत नाही भिती 
सर्व जगी आहे 
        तुझ्या ज्ञानाची कीर्ती !!३!!
भिमा तुझ्या मुळे अंगी 
     हत्तीचे बळ आले आहे !!४!!
आकाश खुले आहे 
    पंखात बळ आहे 
साऱ्या विश्वात उडायला 
        विश्वाचा पसारा आहे !!५!!
भिमा तुझे ज्ञानामृत 
       प्राशन करूनी मी 
विश्वाला घालीन पाठी 
     उद्याच्या भविष्या साठी !!६!!

     नागनाथ डोलारे 
    ज्येष्ठ साहित्यिक, पनवेल

0 Response to "काव्य..ज्वाला !.."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article