-->
ठाणे जिल्ह्यातील शहापूरच्या आदिवासी भागातील युवतीची प्रेरणादायी यशोगाथा.

ठाणे जिल्ह्यातील शहापूरच्या आदिवासी भागातील युवतीची प्रेरणादायी यशोगाथा.


• ITI मधील फॅशन टेक्नॉलॉजी प्रशिक्षणाच्या बळावर उभारला यशस्वी गारमेंट उद्योग.

   डॉ. देवानंद नंदागवळी 
"साप्ताहिक जनता की आवाज"
 
शहापूर (ठाणे) :- जिद्द, कौशल्य आणि मेहनतीच्या बळावर स्वावलंबनाचा आदर्श निर्माण करणाऱ्या शहापूर तालुक्यातील सौ. सपना वेखंडे यांनी ग्रामीण व आदिवासी भागातील महिलांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.

शहापूर येथील रहिवासी असलेल्या सौ. सपना वेखंडे यांनी सन २०२२–२३ या शैक्षणिक वर्षात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), शहापूर येथे फॅशन टेक्नॉलॉजी व्यवसायाचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. प्रशिक्षणादरम्यान त्यांनी शिवणकला, वस्त्रनिर्मिती, गारमेंट डिझाइन, कटिंग, फिनिशिंग आणि आधुनिक वस्त्रनिर्मितीचे तंत्र आत्मसात केले.

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी नोकरीची वाट न पाहता स्वतःचा गारमेंट उद्योग सुरू केला. आज त्यांचा उद्योग शहापूर तालुक्यात विश्वासार्ह नाव म्हणून ओळखला जात आहे. विशेष म्हणजे, शहापूर तालुक्यातील अनेक शासकीय व खासगी शाळांचे शालेय गणवेश तसेच विविध आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचे गणवेशही त्यांच्या गारमेंट उद्योगात तयार केले जातात. त्यामुळे स्थानिक स्तरावर दर्जेदार गणवेश उपलब्ध होत असून अनेक शैक्षणिक संस्थांचा त्यांच्यावर विश्वास निर्माण झाला आहे.

आज सौ. सपना वेखंडे आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्या असून त्यांच्या उद्योगामुळे स्थानिक स्तरावर रोजगाराच्या संधीही निर्माण होत आहेत. त्यांची यशोगाथा ग्रामीण व आदिवासी भागातील युवक-युवतींना कौशल्य विकासाच्या माध्यमातून स्वयंरोजगार उभारण्याची प्रेरणा देणारी आहे.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शहापूर येथे दिले जाणारे गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण, आधुनिक कौशल्ये आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे अनेक प्रशिक्षणार्थी रोजगार व स्वयंरोजगाराच्या दिशेने यशस्वी वाटचाल करत आहेत. सौ. सपना वेखंडे यांचे यश हे "कौशल्यातून स्वावलंबन" या संकल्पनेचे उत्कृष्ट उदाहरण असून शहापूर तालुक्याचा अभिमान आहे. मार्गदर्शक श्रीमती सुचिता चोरगे शिल्प निर्देशक फॅशन टेक्नॉलॉजी ITI शहापूर जि.ठाणे

0 Response to "ठाणे जिल्ह्यातील शहापूरच्या आदिवासी भागातील युवतीची प्रेरणादायी यशोगाथा."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article