-->
२३ जुलैच्या महाराष्ट्र बंदला भंडाऱ्यात पाठींबा..

२३ जुलैच्या महाराष्ट्र बंदला भंडाऱ्यात पाठींबा..


• सर्व सामाजिक संघटना,CJP, भारतीय समाज विधार्थी परिषद भंडारा जिल्हा बंद.

•  व्यापारी,पालक,शिक्षक, नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा.- सर्व सामाजिक संघटना, CJP, भारतीय समाज विधार्थी परिषद यांनी आव्हान केले आहे.


   "साप्ताहिक जनता की आवाज" 
      वृत्तपत्रांनी प्रतिनिधी 

भंडारा :- दिल्ली येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित अमानुष लाठीमाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली असून, या बंदला भंडारा जिल्हयात उत्स्फूर्त प्रतिसाद व   वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला भारतीय समाज विधार्थी परिषद,CJP व विविध सामाजिक संघटनांनी   पाठींबा देण्याचे आव्हान केले आहे.

राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांची महाराष्ट्र बंद पुकार..

वंचित बहुजन आघाडीचे सर्व सामाजिक संघटना, CJP, भारतीय समाज विधार्थी परिषद व वंचित बहुजन आघाडीचे,राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांच्या  निर्देशानुसार राज्यभर महाराष्ट्र बंद पाळण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी तसेच लोकशाही मार्गाने निषेध नोंदविण्यासाठी व्यापारी, व्यावसायिक, सामाजिक संघटना, युवक, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

यासंदर्भात भंडाऱा जिल्ह्यातील सर्व सामाजिक संघटनाचे पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व विविध आघाड्यांच्या प्रतिनिधींनी बंद यशस्वी करण्यासाठी जनजागृती मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला असून, शांततापूर्ण व लोकशाही मार्गाने बंद पाळण्याचे आव्हान नही करण्यात आले आहे.

विविध सामाजिक प्रतिनिधी नीं संपूर्क करण्याचे आव्हान.

बंद दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत सर्वांनी शांततेच्या मार्गाने सहभाग नोंदवावा, असेही आवाहन CJP व भारतीय विधार्थी समाज परिषद,सर्व शिव,फूले,शाहु आंबेडकर, सामाजिक संघटना यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ७०२०१८६१४३,८४५९६१२१९१,अधिक माहितीसाठी संपर्क करण्याची आव्हान केले आहे आहे.

0 Response to "२३ जुलैच्या महाराष्ट्र बंदला भंडाऱ्यात पाठींबा.."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article