विद्यार्थी एकजुटीचा विजय असो..!!..भंडारा बंद चे आव्हान...
बुधवार, 22 जुलाई 2026
Comment
"साप्ताहीक जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी
भंडारा :- आपल्या सर्वांना माहिती आहे की जंतर मंतर, दिल्ली येथे मागील 1 महिन्यापासून NEET पेपरफुटी च्या विरोधात आंदोलन सुरू आहे. त्यातच 20 जुलै 2026 रोजी संसद भवन वर निघालेल्या मार्च मध्ये, सरकारच्या सांगण्यावरून "विद्यार्थ्यांवर/आंदोलकांवर" दिल्ली पोलिस द्वारा अमानुष पद्धतीने लाठीचार्ज करण्यात आला.
या लाठीचार्ज मध्ये अनेक विद्यार्थी, युवक, युवतींना गंभीर दुखापत झालेली आहे.
आपण मुद्दा लक्षात घ्या. शासनाच्या नाकर्तेपणामुळे तसेच NEET पेपर फुटी मुळे देशभरातील 22 विद्यार्थ्यांनी स्वतःचे जीव संपवुन आत्महत्या केली.
या निरागस 22 विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, व यासर्व प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, इतकीच मागणी देशातील कोट्यवधी विद्यार्थी, युवक, युवती, पालक वर्ग करीत आहे.
या सर्वांच्या मागणी कडे लक्ष न देता, एका हुकूमशाह सारखे ही सरकार वागत असून, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला.
या अमानुष कृत्या विरोधात तुम्हा आम्हाला एक जागरूक भारतीय म्हणून आवाज उचलणे आज काळाची गरज आहे.
या प्रकरणाविरोधात भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी, येत्या 23 जुलै 2026 रोजी "भंडारा बंद" ची हाक दिली आहे.
व्यवस्थेच्या नाकर्तेपणामुळे आज आपण 22 विद्यार्थी गमावले, उद्या ही घटना तुमच्या आमच्या घरी देखील घडू शकते.
आणि म्हणून, येत्या 23 जुलै 2026 रोजी आयोजित आंदोलनात आपण सहभागी होणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे
भंडारा जिल्ह्यातील तमाम जागरूक नागरिक, विद्यार्थी, युवक, युवती, शिव-फुले-शाहू-आंबेडकरवादी चळवळीतील सर्व पक्ष/संघटना/पदाधिकारी, सर्व विरोधी पक्षातील नेते/पदाधिकारी/कार्यकर्ते यांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित रहावे..
तसेच या भंडारा बंद ला सर्व व्यावसायिक/नागरिकांनी सहकार्य करावे, ही नम्र विनंती._
दिनांक - 23 जुलै 2026
वेळ - सकाळी 11.00 वाजता
स्थळ - शास्त्री चौक, भंडारा ते जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा
_अधिकार की लड़ाई में न्योते नहीं भेजे जाते, जिनका ज़मीर ज़िंदा होता है, वे ख़ुद-ब-ख़ुद समर्थन में शामिल हो जाते है_
0 Response to "विद्यार्थी एकजुटीचा विजय असो..!!..भंडारा बंद चे आव्हान..."
एक टिप्पणी भेजें