-->
महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघातर्फे " वित्त नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांना निवेदन.

महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघातर्फे " वित्त नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांना निवेदन.



      प्रदीप कडबे (वि.प्र.)
"साप्ताहिक जनता की आवाज"

 रामटेक :- रविवार दि ०५ जुलै २०२६ रोजी नागपूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मा.प्रेमराज कुबडे सर तसेच महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघाचे केंद्रीय कार्यवाह नंदू बनसोड यांचे नेतृत्वात वित्त- नियोजन राज्यमंत्री मा.ना.ऍड.श्री आशिष जयस्वाल, यांना रामटेक येथील निवासस्थानी शिष्टमंडळ भेटले. कर्मचारी संघटनेचे नेते नंदू बनसोड यांनी कर्मचारी संघटनेच्या वतीने निवेदन दिले, ग्रंथालय कर्मचारी यांना अत्यल्प वेतन असल्याने फारच हालकीचे जीवन जगत आहे.असे चर्चे दरम्यान कर्मचारी संघटनेच्या महिला नेत्या तथा महिला ग्रंथालय कर्मचारी दर्शना मस्के, योगिताताई घंग्रेकर,माधुरीताई टेंभेकर,दुर्गाताई लोंढे, सुरेखाताई बोरकर, निर्मलाताई कुहीटे सौं शारदाताई गजभिये, मनीषा महाजन यांनी मंत्री महोदयांसमोर कर्मचारी अत्यल्प वेतनात कसे काम करीत, कुटुंबाची वाताहात कशी होत आहे. संपूर्ण चित्रण उभे केले, त्याच प्रमाणे उपस्थित असलेले ग्रंथालय कार्यकर्ते सागर लोंढे, कैलास समरीत, जागेश्वर गजभिये, नरेंद्र सहारे, पंढरी कडू, प्रबोधनकार भीमशाहीर तथा पत्रकार प्रदीप कडबे,सुनील बादुले, संघपाल डोंगरे,प्रेमचंद कुसुंबे, श्याम बारई, कार्तिक गायकवाड इत्यादिनी ग्रंथालय चालवीण्यास फारच आर्थिक अडचण भासत आहे. असें आवर्जून सांगितले, कर्मचारी नेते नंदू बनसोड व नागपूर जि. ग्रंथा. संघाचे अध्यक्ष प्रेमराज कुबडे यांनी ग्रंथालय कर्मचारी यांना वेतनश्रेणी लागू करावी त्याच प्रमाणे ग्रंथालयाचे अनुदान तिप्पट वाढ केल्यास ग्रंथालय कर्मचारी यांचा वेतनाचा प्रश्न सहज सुटू शकेल. असें सांगितले, यावर मंत्री महोदयांनी भावानिक परिस्थिती लक्षात घेऊन सांगितले की मी संबंधित सचिव यांचेशी चर्चा करून त्यांनी प्रश्नाची सोडवणूक करतो, आपल्या संघटनेच्या मागण्याचा प्रश्न सोडवितो असें आश्वित केले.या प्रसंगी रामटेक, मौदा, पारशिवनी तालुका मधील कार्यकर्ते उपस्थित होते.

0 Response to "महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघातर्फे " वित्त नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांना निवेदन."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article