-->
पंचशील प्रतिष्ठान आष्टापूर यांचा स्तुत्य उपक्रम जयंतीचा खर्च टाळून लोकसेवेसाठी केली ॲम्ब्युलन्स खरेदी.

पंचशील प्रतिष्ठान आष्टापूर यांचा स्तुत्य उपक्रम जयंतीचा खर्च टाळून लोकसेवेसाठी केली ॲम्ब्युलन्स खरेदी.


सोनु संजीव क्षत्रे
"साप्ताहिक जनता की आवाज" 

आष्टापूर :- पंचशील प्रतिष्ठान, अष्टापूर यांच्या वतीने दरवर्षी साजरा करण्यात येणाऱ्या जयंती महोत्सवाचा खर्च टाळून त्या निधीतून समाजोपयोगी रुग्णवाहिका (अॅम्ब्युलन्स) खरेदी करण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत दूरदृष्टीचा, लोकहिताचा आणि प्रेरणादायी आहे.

समाजात उत्सव साजरे करण्याची परंपरा महत्त्वाची असली, तरी त्याचबरोबर समाजाच्या गरजा ओळखून कायमस्वरूपी उपयुक्त ठरेल असा उपक्रम राबविणे ही खरी सामाजिक बांधिलकी आहे. आपल्या या निर्णयामुळे अष्टापूर व परिसरातील अनेक रुग्णांना वेळेवर वैद्यकीय सेवा मिळण्यास मोठी मदत होईल. अनेकांचे प्राण वाचविण्यासाठी ही रुग्णवाहिका निश्चितच जीवनदायी ठरेल.

आपण समाजहिताला प्राधान्य देत कृतीतून आदर्श निर्माण केला पाहिजे. हा उपक्रम इतर सामाजिक संस्था, मंडळे आणि प्रतिष्ठानांसाठीही निश्चितच प्रेरणादायी ठरेल. या हेतूने पंचशील प्रतिष्ठान च्या वतीने हा उपक्रम हाती घेण्यात आला. या समाजहिताच्या अभिनव आणि स्तुत्य उपक्रमाबद्दल पंचशील प्रतिष्ठानचे सर्व कार्यकारिणी सदस्य, सर्व वर्गणीदार यांचे मनपूर्वक आभार. आपल्या हातून भविष्यातही असेच अनेक लोककल्याणकारी उपक्रम घडत राहोत, अशा प्रकारे शुभेच्छा आणि सदिच्छा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आल्या.

0 Response to "पंचशील प्रतिष्ठान आष्टापूर यांचा स्तुत्य उपक्रम जयंतीचा खर्च टाळून लोकसेवेसाठी केली ॲम्ब्युलन्स खरेदी."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article