भंडारा जिल्हा प्रतिनिधी उमेश बोरकर यांना दिल्ली येथील "डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल " पुरस्कार जाहीर.
गुरुवार, 23 जुलाई 2026
Comment
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील सातलवाडा येथील महाराष्ट्र 24 मराठी न्यूजचे भंडारा जिल्हा प्रतिनिधी तसेच भारतीय लोक कलाकार सांस्कृतिक संघटना साकोली तालुका अध्यक्ष उमेश बोरकर यांची भारतीय दलित साहित्य अकादमी नवी दिल्ली यांच्यावतीने प्रदान करण्यात येणाऱ्या "डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल फिलोशिप अवॉर्ड 2026" साठी निवड करण्यात आली आहे. अकादमीने पाठविलेल्या पत्रानुसार या वर्षीचा प्रतिष्ठेचा पुरस्कार दिनांक 12 ते 13 डिसेंबर 2026 रोजी नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय अधिवेशनात प्रदान करण्यात येणार आहे. भारतीय दलित साहित्य अकादमी विविध क्षेत्रातील साहित्यिक, पत्रकार, समाजसेवक आणि मान्यवरांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल दरवर्षी सन्मानित करते. या निवडीबद्दल उमेश बोरकर यांच्यावर विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून पत्रकारिता व सामाजिक तसेच कलाक्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याची ही दखल असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल महाराष्ट्रातील अनेक साहित्यिक, कलावंत व समाजसेवक त्यांचे अभिनंदन करीत आहेत.
0 Response to "भंडारा जिल्हा प्रतिनिधी उमेश बोरकर यांना दिल्ली येथील "डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल " पुरस्कार जाहीर. "
एक टिप्पणी भेजें