-->
जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ साकोलीत कडकडीत बंद.

जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ साकोलीत कडकडीत बंद.

             संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज"

.         निवेदन देतांना सामाजिक कार्यकर्ते 

भंडारा :- दिल्ली येथील जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्र बंदच्या आवाहनानुसार साकोली येथे सकाळपासून बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला .दुपारी 12 वाजता बस स्टॉप च्या समोर सर्वपक्षीय कार्यकर्त्याच्या वतीने मार्च काढण्यात आला. सर्वांचे हातात तिरंगी झेंडे होते. त्यानंतर हा मार्च बस स्टॉप च्या समोरून नागझिरा येथील चौकासमोरील शाळेत तसेच पोलीस स्टेशन मार्ग लाखांदूर रोड जुन्या तहसील ऑफिस समोर सभेमध्ये रूपांतर झाले .
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेश प्रधान यांनी राजीनामा द्यावा, पेपर फुटी प्रकरणात ज्या मुलांनी आत्महत्या केली त्यांना आर्थिक मदत करण्यात यावी, २० जुलै झालेल्या लाठीमार प्रकरणांमध्ये जखमी झालेल्यांना आर्थिक मदत करण्यात यावी व लाठीदार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली अशा विविध मागण्या करण्यात आल्या.
त्या मागण्यांचे निवेदन एच डी ओ मार्फत सरकारकडे पाठवण्यात आले .
सभे मध्ये काँग्रेसचे अशोक कापगते, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव डी जी रंगारी, सामाजिक कार्यकर्ते अचल मेश्राम, कैलास गेडाम, विलास मेश्राम, बसपाचे बिट्टू गजभिये, भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे शिवकुमार गणवीर, काँग्रेसचे दिलीप मासुरकर, शब्बीर पठाण, काँग्रेसचे लालू करंजीकर, जनजागरण कलावंत संघटनेचे भावेश कोठांगले यांचे भाषणे झालीत 
निवेदनावर काँग्रेसचे अशोक कापगते, भारतीय क्यामुनिष्ठ पार्टी के शिवकुमार गणवीर,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चे किशोर चन्ने, प्रमोद मेश्राम, सामाजिक कार्यकर्ते कैलास गेडाम, अचल मेश्राम, वंचित चे डी जी रंगारी, तनुजा नागदेवे, भावेश कोठांगले, समता सैनिक दलाचे प्रमिला टेंभुरकर, महामाया महिला संघटनेचे शितल नागदेवे, सह्या होत्या व मोर्चात सभापती शीतल राऊत, माजी सभापती मदत रामटेके,
इतर सर्व पक्षातील व सामाजिक क्षेत्रातील सामाजिक संघटनेतील बहुसंख्य कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते

0 Response to "जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ साकोलीत कडकडीत बंद."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article