-->
प्रबोधनकार भीम शाहीर तथा पत्रकार सदानंद शहादेव मोरे यांना " राज्यस्तरीय कला गौरव पुरस्कार जाहीर.

प्रबोधनकार भीम शाहीर तथा पत्रकार सदानंद शहादेव मोरे यांना " राज्यस्तरीय कला गौरव पुरस्कार जाहीर.


 प्रदीप कडबे.
"साप्ताहिक जनता की आवाज"
 
अकोला :- तेल्हारा तालुक्यातील दापोरा येथील बुद्ध फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा बुलंद आवाज प्रबोधनकार भीमशहर तथा पत्रकार, महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक, महाराष्ट्र 24 मराठी न्यूज चे अकोला जिल्हा प्रतिनिधी सदानंद मोरे यांची तेजस फाउंडेशन नाशिक या संस्थेच्या वतीने पुरस्कार निवड समितीने भिमशाहिर सदानंद मोरे यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन " राज्यस्तरीय कला गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. तेजस फाउंडेशन या संस्थेच्या संस्थापिका / अध्यक्ष मेघा डोळस यांनी पाठवलेल्या निवड पत्रानुसार दिनांक - 8 ऑगस्ट 2026 रोजी कार्यक्रमाचे स्थळ - डॉक्टर मौलाना आझाद संशोधन केंद्र, टी व्ही, सेंटर, छत्रपती संभाजी नगर औरंगाबाद, येथे आयोजित कार्यक्रमात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तेजस फाउंडेशन नाशिक या संस्थांच्या वतीने विविध क्षेत्रातील साहित्यिक पत्रकार समाजसेवक आणि मान्यवरांच्या त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल दरवर्षी संस्था सन्मानित करते. या निवडीबद्दल भीम शाहीर सदानंद मोरे यांच्यावर विविध स्तरातून अभिनंदनच्या वर्षाव होत असून पत्रकारिता, ग्रंथालय, सामाजिक, कलाक्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याची ही दखल असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल महाराष्ट्रातील अनेक साहित्यिक कलावंता ग्रंथालय पत्रकार समाजसेवक त्यांचे अभिनंदन करीत आहे. शुभेच्छुक :- प्रेरणा सार्वजनिक वाचनालय डॉक्टर आंबेडकर चौक किरणापुर तालुका रामटेक जिल्हा नागपूर. भीमशाहीर तथा पत्रकार प्रदीप कडबे रामटेक यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

0 Response to "प्रबोधनकार भीम शाहीर तथा पत्रकार सदानंद शहादेव मोरे यांना " राज्यस्तरीय कला गौरव पुरस्कार जाहीर."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article