उन्माद सत्तेचा…..
रविवार, 19 जुलाई 2026
Comment
सोनम वांगचुकांचे जनआंदोलन,
सत्तेच्या दडपशाहीने चिरडले;
कसे म्हणावे देशात आहे लोकशाही,
जिथे संविधानिक मूल्यांनाच पायदळी तुडविले..!!
नाही कसलीच जिवाची पर्वा त्यांना,
जे लढतात निरंतर सत्याच्या वाटेवर;
सत्यालाच येथे बळाने कैद केले,
भ्रष्ट व्यवस्थेच्या लोखंडी श्रुंखलात अखेर..!!
हा आवाज आहे गुंजणाऱ्या हिमालयाचा,
जो अन्यायापुढे कधी झुकणार नाही;
हा उन्माद आहे सत्तेच्या अहंकाराचा,
जनतेचा न्याय अखेर हरणार नाही..!!
लोकशाहीच्या पायावर उभी आहे ही भूमी,
हुकूमशाहीला येथे कदापी स्थान नाही;
तानाशाही सत्ताधाऱ्यांनो, लक्षात ठेवा—
सत्याचा दीप कधीही विझणार नाही..!!
पिपरी (पुनर्वसन), जि. भंडारा.
0 Response to "उन्माद सत्तेचा….."
एक टिप्पणी भेजें