राम रक्षा अभियान' अंतर्गत श्रीराम मंदिर, तुमसर येथे रामरक्षा स्तोत्र पठण व महाआरती कार्यक्रम संपन्न.
रविवार, 19 जुलाई 2026
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी
या कार्यक्रमात सामूहिक रामरक्षा स्तोत्र पठण व त्याचे मराठीत भाषांतर करण्यात आले. सोबतच हनुमान चालीसा पठण, श्रीराम स्तोत्र पठण आणि श्रीराम नामाच्या जयघोषात महाआरती करण्यात आली. या धार्मिक वातावरणामुळे संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय झाला होता. कार्यक्रम आटोपल्यानंतर सर्व उपस्थित भाविकांना प्रसाद व केळीचे वाटप करण्यात आले.
मंदिर व्यवस्थापन व अयोध्या चोरी प्रकरणावर कठोर कारवाईची मागणी.
या धार्मिक उपक्रमाचे नेतृत्व माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे जिल्हाध्यक्ष श्री. चरण भाऊ वाघमारे यांनी केले. यावेळी बोलताना त्यांनी देशातील श्रीराम मंदिरांसह सर्वच देवस्थानांचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने होणे गरजेचे असल्याचे सांगितले. यासाठी राज्यातील शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानच्या आदर्श मंदिर व्यवस्थापनाचा सल्ला व मार्गदर्शन सर्व देवस्थानांनी घ्यावे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
तसेच, अयोध्या येथील अखिल भारतीयांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीराम मंदिरात अलीकडेच झालेल्या चोरीच्या घटनेचा निषेध करत, अशा घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारने कठोर पावले उचलावीत आणि दोषींवर तात्काळ कडक कारवाई करून त्यांना शिक्षा द्यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.मान्यवरांची व रामभक्तांची मोठी उपस्थिती
या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे प्रदेश सचिव हिरालाल नागपुरे, जिल्हा सरचिटणीस गौरव नवरखेले, मेहताबसिंग ठाकूर, अनिल भाऊ जिभकाटे, छोटू भाऊ तुरकर, प्रकाश भाऊ दुर्गे, अरुण मोखारे सर, हेमराज नागफासे सर, महादेव बुरडे, बालचंद बोंद्रे, के. बी. चौरागडे, ठाकचंद मुंगुसमारे, नंदलाल गोपाले, उर्मिला ताई लिल्हारे, वैशाली ताई गभने, रवींद्र बाभरे, बबलू मलेवार, कैलास झंझाड, प्रकाश खराबे, अंकुश दमाहे, पिंटू हुड, संभाजी धांडे, रमेश हलमारे, सागर बिसने, डॉ. घनश्याम मडावी, राहुल बडवाईक, गोपी हटवार, अमित मेश्राम, श्री. चौबे, अनिल गभणे, हेमंत मलेवार, मुकेश वाघमारे, श्रीकृष्ण ढबाले, किशोर भैरम, शांताराम आकरे, देवानंद साहूसाखरे, अरुण समरीत, शंकर सेलोकर, विजय रहांगडाले सर, जवाहर कुंभलकर यांच्यासह मोठ्या संख्येने रामभक्त, महिला, युवक व ज्येष्ठ नागरिक कुटुंबासह उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राम रक्षा अभियान समिती व श्रीराम मंदिर, तुमसरच्या आयोजकांनी अथक परिश्रम घेतले.
0 Response to "राम रक्षा अभियान' अंतर्गत श्रीराम मंदिर, तुमसर येथे रामरक्षा स्तोत्र पठण व महाआरती कार्यक्रम संपन्न."
एक टिप्पणी भेजें