तुमसर येथे मतदार यादीत घोळ, असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
गुरुवार, 2 जुलाई 2026
Comment
•™प्रशासनाकडे तातडीच्या चौकशीची मागणी : चुकीचे मॅपिंग रद्द करा; तहसीलदारांना निवेदन.
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी
तुमसर :- भारत निवडणूक आयोगामार्फत सध्या सुरू असलेल्या एस.आय.आर. (विशेष सखोल फेरतपासणी) मोहिमेदरम्यान तुमसर तालुक्यातील स्टेशनटोली गावात मतदार यादीसंदर्भात गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप समोर आला आहे. गावात वास्तव्यास नसलेल्या अनेक नागरिकांची नावे स्थानिक रहिवासी म्हणून मतदार यादीत मॅप करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्याने संपूर्ण प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तुमसर नागरिकाकडून तहसीलदार यांना लेखी निवेदन.
यासंदर्भात नागरिकांनी तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी, तुमसर यांना लेखी निवेदन सादर करून चुकीचे मॅपिंग तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. निवेदनानुसार, संबंधित बीएलओमार्फत करण्यात आलेल्या मॅपिंग प्रक्रियेत अनेक नागरिकांची नावे प्रत्यक्ष वास्तव्य नसतानाही स्टेशनटोली गावाशी जोडण्यात आली आहेत.
माहितीनुसार, काही नागरिक सध्या देव्हाडी येथे वास्तव्यास असूनही त्यांची नावे स्टेशनटोली येथे मॅप करण्यात आली आहेत. तर काही नागरिक बल्लारपूर (जिल्हा चंद्रपूर) येथे कायमस्वरूपी राहत असल्याची माहिती असून त्यांची नावे गावातील मतदार यादीत समाविष्ट करण्यात आल्याचे नमूद आले आहे.एवढेच नव्हे तर युनिव्हर्सल फेरो क्वार्टर्समध्ये पूर्वी राहत असलेले, पण सध्या इतरत्र स्थलांतरित झालेले नागरिकदेखील अद्याप मतदार यादीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
बाहेरगावचे नागरिक यादीत कसे ?
"या यादीमध्ये बाहेरगावी कायमस्वरूपी राहत असलेल्यांची नावेदेखील आहेत. इतरत्र स्थलांतरीत झालेल्यांची नावे अद्यापही कायम असल्याने निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता धोक्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे".
या संपूर्ण प्रकारामुळे मतदार यादीची अचूकता आणि निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे या प्रकरणाची सूक्ष्म चौकशी करून निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार प्रत्यक्ष गावात राहत नसलेल्या सर्वांची नावे तात्काळ अनमॅप
"मतदार पुनर्निरीक्षण कार्यक्रमांतर्गत नागरिकांनी विविध स्तरांवरून प्राप्त झालेले फॉर्म बिनचूक भरून द्यावेत. तसेच या मोहिमेत कार्यरत कर्मचारी, बीएलओ व संबंधित यंत्रणांनी पूर्ण अचूकतेने काम करणे आवश्यक आहे. कामात दिरंगाई अथवा निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल."
उपेश अंबादे.
तहसीलदार, तुमसर
करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन त्वरित कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. प्रशासन या गंभीर तक्रारीवर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0 Response to " तुमसर येथे मतदार यादीत घोळ, असल्याचा आरोप करण्यात आला आहे."
एक टिप्पणी भेजें