पक्षांतरानंतर एका दिवसातच उपसभापतिपद मिळवणारे सचिन अहिर एकमेव.
गुरुवार, 2 जुलाई 2026
Comment
• पक्ष बदलून 24 तासांत अहिर झाले विधान परिषदेचे 17 वे उपसभापती.
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी
मुंबई :- मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास शिवसेनेत (शिंदे) प्रवेश करणारे उद्धवसेनेचे आमदार सचिन अहिर यांची बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास महाराष्ट्र विधान परिषदेचे १७ वे उपसभापती म्हणून निवड झाली. उद्धवसेनेचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकरांनी माघार घेतल्याने अहिरांची निवड बिनविरोध झाली. पक्षांतर करून उपसभापतिपद मिळवणारे म्हणून अहिर यांची महाराष्ट्र तसेच विधान परिषदेच्या इतिहासात नोंद झाली आहे. या निवडीच्या निमित्ताने राजकीय टोलेबाजी झाली.
'योग्य वेळी योग्य निर्णय घेणारेच यशस्वी ठरतात. आणि अहिर त्यात पारंगत आहेत' असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. उपमुख्यमंत्री शिंदेंनी अहिर यांचे कौतुक करताना उद्धव ठाकरेंचे नाव न घेता टोला लगावला की, 'नेतृत्व सिद्ध करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. लोकांच्या अडीअडचणीला धावून जावे
लागते.' सत्ताधाऱ्यांना प्रत्युत्तर देताना इच्छुक उपसभापतिपदासाठी नीलम गो-हेंना टोला लगावत उद्धवसेनेचे आमदार अनिल परब म्हणाले की, 'अहिर यांच्या रूपातील बुलडोझरने अनेकांच्या स्वप्नांचा चक्काचूर केला.' तत्पूर्वी परिषदेतील संख्याबळ महायुतीच्या बाजूने
असल्याने अहिर यांचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र संसदीय परंपरा जपत विरोधकांनी अर्ज मागे घ्यावा, असे आवाहन संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. त्याला
प्रतिसाद देत परब यांनी अभ्यंकर यांच्या माघारीची घोषणा केली.
विधान उपसभापतिपदासाठी परिषद शिवसेनेकडून (शिंदे) कृपाल तुमाने, नीलम गो-हे, मनीषा कायंदेंची नावे सोमवारी रात्रीपर्यंत चर्चेत होती. मात्र, नुकतेच शिवसेनेत दाखल झालेले खा. संजय दिना पाटील यांनी मध्यरात्री गेम चेंज केला आणि अहिर शिवसेनेत दाखल झाले. सूत्रांनी सांगितले की, बंडखोरीनंतर खासदार संजय राऊत यांनी खा. पाटील यांच्यावर गलिच्छ भाषेत टीका केली होती. त्याला तसेच उत्तर पाटील यांनी दिले. पण राऊत तसेच उद्धवसेनेला धक्का देण्याचेही त्यांनी त्याच वेळी ठरवले. एकेकाळी खा. पाटील आणि अहिर राष्ट्रवादीत एकत्र काम करत होते. त्या जुन्या नात्याचा वापर करत पाटील यांनी शिंदेंशी सल्लामसलत करून सोमवारी मध्यरात्री अहिरांशी संपर्क साधला आणि पहाटेच्या सुमारास अहिरांनी पक्षांतराचा अंतिम निर्णय घेतला.
0 Response to "पक्षांतरानंतर एका दिवसातच उपसभापतिपद मिळवणारे सचिन अहिर एकमेव."
एक टिप्पणी भेजें