-->
'माणदेश न्यूज'चे संपादक विजय टाकणे यांना प्रतिष्ठेचा 'शब्दवेध गौरव पुरस्कार' जाहीर.

'माणदेश न्यूज'चे संपादक विजय टाकणे यांना प्रतिष्ठेचा 'शब्दवेध गौरव पुरस्कार' जाहीर.


.          सचिन सरतापे 
"साप्ताहिक जनता की आवाज"

म्हसवड/सातारा :- पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय व सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत 'माणदेश न्यूज'चे संपादक विजय रंगनाथ टाकणे यांना यंदाचा प्रतिष्ठेचा 'शब्दवेध गौरव पुरस्कार 2026' जाहीर झाला आहे. या पुरस्काराच्या घोषणेमुळे म्हसवड व संपूर्ण माणदेश परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

'आयार्यवी एंटरटेनमेंट'च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार, मुक्त पत्रकार, संपादक, कला, साहित्य आणि समाजसेवक पुरस्कार सोहळा 2026 अंतर्गत हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. ग्रामीण पत्रकारितेतून सर्वसामान्यांचे प्रश्न शासनापर्यंत पोहोचविणे, सामाजिक विषयांना न्याय देणे आणि माणदेश परिसरातील विविध घडामोडींना प्रभावीपणे वाचा फोडणे या कार्याची दखल घेत श्री. टाकणे यांची निवड करण्यात आली आहे.

दैनिक माणदेश' आणि 'माणदेश न्यूज'च्या माध्यमातून त्यांनी अनेक वर्षे ग्रामीण भागातील प्रश्न, शेतकरी, सामाजिक, सांस्कृतिक आणि विकासाशी संबंधित विषयांवर सातत्याने काम केले आहे. त्यांच्या निःपक्ष, निर्भीड व जनहिताच्या पत्रकारितेमुळे त्यांना यापूर्वीही विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले असून, आता 'शब्दवेध गौरव पुरस्कार' हा त्यांच्या शिरपेचातील आणखी एक मानाचा तुरा ठरला आहे.

या पुरस्काराबद्दल पत्रकार, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच माणदेश परिसरातील नागरिकांकडून श्री. विजय टाकणे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

पुरस्कार वितरण सोहळा रविवार, 12 जुलै 2026, रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 1.00 या वेळेत सुरेंद्र गावंडकर हॉल, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर (पूर्व), मुंबई येथे संपन्न होणार आहे.

0 Response to "'माणदेश न्यूज'चे संपादक विजय टाकणे यांना प्रतिष्ठेचा 'शब्दवेध गौरव पुरस्कार' जाहीर."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article