-->
अर्जुन हरगुडेची भारतीय कनिष्ठ हॉकी संघात बेल्जियम दौऱ्यासाठी निवड.

अर्जुन हरगुडेची भारतीय कनिष्ठ हॉकी संघात बेल्जियम दौऱ्यासाठी निवड.



• अर्जुनचा आदर्श घेऊन आपल्या आवडीच्या खेळामध्ये पारंगत झाले पाहिजे-श्रीमती सरिता अनिल गायकवाड.

सोनु संजीव क्षेत्रे
"साप्ताहिक जनता की आवाज" 

केसनंद :- आगामी बेल्जियम दौऱ्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या भारताच्या २० पुरुष हॉकी संघात केसनंद (ता. हवेली) गावचा रहिवासी असलेला उदयोन्मुख हॉकीपटू अर्जुन संतोष हरगुडे याची निवड झाल्याने केसनंद गावासह पुणे जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे.अर्जुन हरगुडे वर्षांखालील (कनिष्ठ) 'हॉकी इंडिया'ने ५ ते १८ जुलै २०२६ या कालावधीत होणाऱ्या बेल्जियम दौऱ्यासाठी २२ सदस्यीय भारतीय कनिष्ठ
संघाची घोषणा केली आहे. मुख्य प्रशिक्षक फ्रेडरिक सोयेझ यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय कनिष्ठ संघाचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय दौरा असणार आहे. राष्ट्रीय स्तरावरील सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरी, खेळाप्रति असलेली निष्ठा आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर अर्जुनने भारतीय संघात मानाचे स्थान मिळवले आहे. अर्जुनला लहानपणापासूनच त्याचे वडील तथा केसनंदचे माजी उपसरपंच संतोष हरगुडे यांच्यासह संपूर्ण कुटुंबाचे मोलाचे पाठबळ लाभले.

"अर्जुन हरगुडे हा फुलगाव येथील लोकसेवा प्रतिष्ठान संचालित नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी स्कूलचा विद्यार्थी आहे. याच शाळेत त्याची खेळाची सुरुवात झाली असून आज तो राष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करत आहे, याचा सार्थ अभिमान व आनंद असून एक दिवस तो भारताच्या संघाचे नेतृत्व करेल," असा विश्वास संस्थाप्रमुख दीपक पायगुडे यांनी व्यक्त केला.ऑलिंपिकपटू धनराज पिल्ले व विक्रम पिल्ले यांच्यानंतर भारतीय संघात थेट प्रतिनिधित्व करणारा अर्जुन हा या राज्यातील तिसरा खेळाडू ठरला आहे. "आजवर त्याला हॉकी महाराष्ट्राचे वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज भोरे तसेच ऑलिंपिकपटू विक्रम पिल्ले यांच्यासह प्रशिक्षक अनिकेत मोरे, सागरसिंग ठाकूर यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे," असे अर्जुनचे वडील संतोष हरगुडे यांनी सांगितले.

*क्रीडाप्रेमींना अर्जुनकडून अपेक्षा*
बेल्जियम दौऱ्यात भारतीय कनिष्ठ संघाचा युरोपातील बलाढ्य संघांविरुद्ध सराव सामने होणार असून, त्यामुळे खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील मौल्यवान अनुभव मिळणार आहे. या दौऱ्यातील कामगिरीच्या जोरावर अर्जुन हरगुडे भारतीय कनिष्ठ संघात आपले स्थान अधिक भक्कम करण्याचा प्रयत्न करणार असून, त्याच्याकडून महाराष्ट्रासह संपूर्ण देशाच्या क्रीडाप्रेमींना अपेक्षा आहेत.

0 Response to "अर्जुन हरगुडेची भारतीय कनिष्ठ हॉकी संघात बेल्जियम दौऱ्यासाठी निवड."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article