-->
लाखांदूर येथे १९ जुलैला शाहू महाराजांच्या महामेळावाचे आयोजन.

लाखांदूर येथे १९ जुलैला शाहू महाराजांच्या महामेळावाचे आयोजन.


• सामाजिक न्यायाच्या विचारांचा जागर!..

           नरेंद्र मेश्राम 
"साप्ताहिक जनता की आवाज"

भंडारा :- पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या "राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती समारोह अभियान – २०२६" अंतर्गत रविवार, दि. १९ जुलै रोजी दुपारी १२.३० वाजता लाखांदूर येथील पेन्शनर भवन, (आशीर्वाद मंगल कार्यालया जवळील ) येथे भव्य विचारप्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सामाजिक न्याय, समता, शिक्षण आणि संविधानवादी विचारांचा जागर घडवून आणत शाहू महाराजांच्या कार्याची महती आधुनिक काळात जन सामान्यांमध्ये रुजविण्यात येणार आहे.
यासाठी कार्यक्रमाचा मुख्य विषय "वर्तमानात राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज यांच्या विचारांची प्रासंगिकता" हा असून, आजच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय परिस्थितीत शाहू महाराजांचे विचार किती मार्गदर्शक आणि आवश्यक आहेत, यावर मान्यवर वक्ते सखोल मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रशिद्ध समाजचिंतक तथा विश्लेषक मु.चेतन निमगडे आरमोरी, जिल्हा गडचिरोली हे करतील तथा पी.पी.आय.(डी.) नागपूरचे जिल्हाध्यक्ष आणि मुलनिवासी बहुजनवादी विचार विश्लेषक मु. अनिल चिमनकर तसेच संशोधक प्रा.डॉ.बंडू बी.मेश्राम, मुंबई,
आणि गोंदिया जिल्हा उपाध्यक्ष तत्वचिंतक मु.हरिष कोहळे यासोबतच भंडारा जिल्हा कार्यकारिणी सदस्य मु. देविलाल नेपाळे सह भंडारा जिल्हा कार्यकारिणी सचिव मु.वसंत मूंडले यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहून शाहू महाराजांचे लोककल्याणकारी कार्य, भारतीय संविधान, सामाजिक न्याय, शिक्षणातील समान संधी, आरक्षणाचे महत्त्व आणि बहुजन मुलनिवासी समाजाच्या सक्षमीकरणावर मार्गदर्शन करणार आहेत. या संपूर्ण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटीकचे जिल्हाध्यक्ष दिपक मेश्राम हे असणार आहे.
       यावेळी पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक)चे संकल्पपत्र नागरिकांसमोर मांडण्यात येणार असून, शिक्षण, रोजगार, आरोग्य, महिला सक्षमीकरण, शेतकरी, कामगार, सामाजिक सुरक्षा आणि संविधानाच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भातील पक्षाची भूमिका सविस्तर स्पष्ट करण्यात येणार आहे. तसेच उपस्थित नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नांवर चर्चा केली जाणार असून, सामाजिक परिवर्तनासाठी युवकांनी सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहनही करण्यात येणार आहे.
लाखांदूर परिसरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, युवक, महिला, विद्यार्थी आणि संविधानप्रेमींनी या विचारप्रबोधन कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
दरम्यान, या राष्ट्रव्यापी "राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती समारोह अभियान – २०२६" चा भव्य समारोप शुक्रवार, दि. २५ जुलै २०२६ रोजी सायंकाळी २.०० वाजता कोल्हापूर येथील महा सैनिक दरबार हॉल येथे होणार असून, देशभरातील कार्यकर्ते, विचारवंत आणि नागरिकांच्या उपस्थितीत अभियानाची सांगता करण्यात येणार आहे.

0 Response to "लाखांदूर येथे १९ जुलैला शाहू महाराजांच्या महामेळावाचे आयोजन."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article