-->
अकोला जिल्ह्यात बोगस सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबारा पेरणीचे संकट.

अकोला जिल्ह्यात बोगस सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबारा पेरणीचे संकट.



तेल्हारा,आकोट,मूर्तिजापूर, बार्शीटाकळी, पातूर आणि बाळापूर तालुक्यात शेतकरी हवालदिल.

जिल्हा कृषी अधिकारी यांना सम्राट अशोक सेनेची तात्काळ आर्थिक नुकसान भरपाईची मागणी.
.        नेते आकाशभाई सिरसाट व पदाधिकारी 

     संजीव भांबोरे संपादक 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

अकोला :- मृग नक्षत्राच्या सुरुवातीला झालेल्या समाधानकारक पावसामुळे अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने सोयाबीनची पेरणी केली होती. मात्र, बाजारातून खरेदी केलेल्या नामांकित कंपन्यांच्या सोयाबीन बियाण्यांनी शेतकऱ्यांना साफ दगा दिला आहे. पेरणी उलटून अनेक दिवस झाले तरी बियाण्यांची उगवणच झाली नसल्याचा धक्कादायक प्रकार अकोला जिल्ह्यात समोर आला आहे.

 यामुळे जिल्ह्यातील तेल्हारा, आकोट, मूर्तिजापूर,बार्शीटाकळी, पातूर, बाळापूर या तालुक्यांसह संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुबारा पेरणीचे अस्मानी व सुलतानी संकट ओढवले आहे.शेतकऱ्यांनी हजारो रुपये खर्च करून, कर्ज काढून बियाणे आणि खते खरेदी केली होती. मात्र, कृषी विभागाच्या दुर्लक्षामुळे आणि बोगस बियाणे विक्रेत्यांच्या नफेखोरीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. "या गंभीर परिस्थितीला जबाबदार कोण?" असा संतप्त सवाल आता शेतकरी विचारत आहेत.
या संपूर्ण प्रकारावर 'सम्राट अशोक सेना, महाराष्ट्र राज्य'चे नेते आकाशदादा शिरसाट यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी प्रशासनाला इशारा देत म्हटले आहे की, "शेतकरी आधीच आर्थिक संकटात असताना बोगस बियाण्यांनी त्यांची कंबर तोडली आहे. कृषी विभागाने तात्काळ प्रत्येक तालुक्यात जाऊन बोगस बियाण्यांचे पंचनामे करावेत. दोषी कंपन्या आणि विक्रेत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत. तसेच पीडित शेतकऱ्यांना प्रशासनाने तात्काळ आर्थिक नुकसान भरपाई जाहीर करावी, अन्यथा सम्राट अशोक सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल."

​या बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचा खते, मशागत आणि बियाण्यांवर झालेला हजारो रुपयांचा खर्च पाण्यात गेला असून, आता दुबारा पेरणीसाठी शेती उपयोगी साहित्य आणायचे कुठून, असा यक्षप्रश्न अकोल्यातील बळीराजासमोर उभा ठाकला आहे. यावर आता जिल्हा प्रशासन आणि कृषी विभाग काय पावले उचलणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली. नाहीतर जिल्हाभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.!!

निवेदन देताना विजय हिरवडे,सनी भाऊ सरदार, वैभव इंगळे,संमेक डोंगरे,धनु चक्रनारायण. व इतर सामाजिक कार्यकर्ता या आंदोलनात उपस्थित होते.

0 Response to "अकोला जिल्ह्यात बोगस सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबारा पेरणीचे संकट."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article