-->
उघा भंडारा जिल्ह्यात प्रथमच उतरणार विदर्भातील ५०० च्या वर पत्रकार.

उघा भंडारा जिल्ह्यात प्रथमच उतरणार विदर्भातील ५०० च्या वर पत्रकार.



• पोलीस बहुउद्देशीय सभागृहात रविवार १२ जुलैला "पत्रकार हक्क परिषद" चे अभिनव आयोजन.

          दिगंबर देशभ्रतार
 "साप्ताहिक जनता की आवाज" 

 तुमसर :- पत्रकारांचे संरक्षण, हक्क आणि न्यायासाठी "व्हॉईस ऑफ मीडिया" च्या वतीने २० वर्षांनी प्रथमच भंडारा जिल्ह्यात विदर्भातील ५०० हून अधिक पत्रकार उतरणार आहेत. उघा रविवार १२ जुलैला दु. १ वा. पोलीस बहुउद्देशीय सभागृह भंडारा येथे "पत्रकार हक्क परिषद" व विविध गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

 या भव्य दिव्य सोहळ्याला जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह अनेक दिग्गज राजकीय व प्रशासकीय नेते एकाच विचार पिठावर उपस्थित राहणार आहेत. या परिषदेच्या अंतर्गत माजी सैनिकांचा तसेच जिल्ह्यातील पत्रकारांच्या प्राविण्यप्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. याप्रसंगी परिषदेचे मुख्य मार्गदर्शक "व्हॉईस ऑफ मीडिया" चे संस्थापक व केंद्रीय अध्यक्ष संदीप काळे हे असतील. तर संघटनेचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष अनिल मसके, संचालक किशोर करंजेकर, कार्याध्यक्ष नरेंद्र देशमुख, विदर्भ विभाग अध्यक्ष व्यंकटेश दुडमवार आणि गडचिरोलीचे प्रवक्ता नसिर हाशमी यांच्या प्रमुख उपस्थितीत व विशेष अतिथी मध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, उद्योजक जयंत गज्जर, हिंदवी प्रतिष्ठान संस्थापक जॅकी रावलानी, उद्योजक डिम्पल मल्होत्रा, रूपेश टांगले, विशेष निमंत्रित मध्ये भंडारा जिल्हाधिकारी सावन कुमार व जिल्हा पोलीस अधिक्षक नुरूल हसन यांची उपस्थिती लाभणार आहे. 

 सायं. ०४ वाजता देशासाठी लढलेल्या वीर जवान माजी सैनिकांचा सत्कार, पत्रकारांच्या प्राविण्यप्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याला प्रमुख उपस्थिती पालकमंत्री ना. पंकज भोयर, खासदार डॉ. प्रशांत पडोळे, आमदार डॉ. परीणय फुके, आ. अविनाश ब्राह्मणकर, आ. नरेंद्र भोंडेकर, आ. नाना पटोले, आ. राजू कारेमोरे, जि. प. अध्यक्ष कविता उईके, माजी खा. सुनील मेंढे, जि. प. उपाध्यक्ष एकनाथ फेंडर, नाना पंचबुध्दे, माजी आ. चरण वाघमारे, भाजपा जिल्हाध्यक्ष आशु गोंडाणे, शिवसेना अध्यक्ष अनिल गायधने, कॉंग्रेस अध्यक्ष मुकूंद गायधने, शिवसेना ( उबाठा ) अध्यक्ष संजय रेहपाडे हे प्रामुख्याने उपस्थित असतील. 

याचबरोबर या भव्य दिव्य सोहळ्याला संगीतमय सांस्कृतिक कार्यक्रमात बॉलिवूड गायिका राधा खुळे व प्रणय सतलज यांच्या "पाटलांचा बैलगाडा" हा सदाबहार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सदर संपूर्ण कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन व्हॉईस ऑफ मीडिया भंडारा जिल्हा अध्यक्ष शशिकांत भोयर यांनी केले आहे.

0 Response to "उघा भंडारा जिल्ह्यात प्रथमच उतरणार विदर्भातील ५०० च्या वर पत्रकार."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article