-->
जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांच्या मारहाण, निषेधार्थ आज तुमसरात  बंदची हाक मातोश्री लानवरुन तहसील कार्यालयावर मोर्चा.

जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांच्या मारहाण, निषेधार्थ आज तुमसरात बंदची हाक मातोश्री लानवरुन तहसील कार्यालयावर मोर्चा.


               दिगंबर देशभ्रतार 
      साप्ताहिक जनता की आवाज" 

भंडारा/तुमसर :- दि. २४ जुलैः NEET पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी, मृत विद्यार्थ्यांना न्याय मिळावा तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, या मागण्यांसाठी भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थी संघटनांनी 2४ जुलै 2026 रोजी 'तुमसर बंद'ची हाक दिली आहे. या दिवशी सकाळी 11 वाजता मातोश्री लान नविन बसस्टाप येथून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
आयोजकांच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, दिल्लीतील जंतर-मंतर येथे गेल्या महिनाभरापासून NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आंदोलन सुरू असून, 20 जुलै रोजी संसद भवनाकडे निघालेल्या मोर्चादरम्यान आंदोलकांवर दिल्ली पोलिसांनी
लाठीचार्ज केल्याचा आरोप करण्यात आला आहे.या घटनेत अनेक विद्यार्थी व आंदोलक जखमी झाल्याचा दावाही करण्यात आला आहे.

प्रसिद्धीपत्रकात असेही नमूद करण्यात आले आहे की, NEET पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी असून, या प्रकरणात मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि जबाबदार

व्यक्तींनी नैतिक जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणी विद्यार्थी व पालकांकडून केली जात आहे.

तुमसर बंदला तालुक्यातील विद्यार्थी, युवक-युवती, विविध सामाजिक संघटना, सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच व्यापारी व नागरिकांनी शांततापूर्ण पद्धतीने सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

0 Response to "जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांच्या मारहाण, निषेधार्थ आज तुमसरात बंदची हाक मातोश्री लानवरुन तहसील कार्यालयावर मोर्चा."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article