-->
जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांच्या मारहाण, निषेधार्थ तुमसर तहसीलदारनां निवेदन.

जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांच्या मारहाण, निषेधार्थ तुमसर तहसीलदारनां निवेदन.



• जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांच्या मारहाण, निषेधार्थ आज तुमसर बंदची हाक मातोश्री लानवरुन तहसील कार्यालयावर मोर्चा.

       दिगंबर देशभ्रतार 
साप्ताहिक जनता की आवाज" 

भंडारा/तुमसर :- दि. २३ जुलैः NEET पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी, मृत विद्यार्थ्यांना न्याय मिळावा तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, या मागण्यांसाठी भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थी संघटनांनी 23 जुलै 2026 रोजी 'तुमसर बंद'ची हाक दिली आहे. या दिवशी सकाळी 11 वाजता मातोश्री लान नविन बसस्टाप येथून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला.
.      निवेदन स्वीकारतांना तहसीलदार अंबादे साहेब 

तुमसर तहसील कार्यालयासमोर ,भारतीय विद्यार्थी समाज परिषदेचे,विद्यार्थी व विविध संघटनेचे पदाधिकारी,शिक्षक पालक मोठ्या संख्येने सहभागी होत केंद्रीय शिक्षण मंत्री सरकार च्या अनैतिक विरोधात व विध्यार्थी नां दिल्ली पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीमाराच्या निषेधार्थ निदर्शने, आंदोलन करत "धर्मेंद्र प्रधान" यांच्या इस्तीफा देण्याची मागणी व शिक्षण क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी मागणी करत,तुमसर तहसीलदार अंबादे साहेब यांना निवेदन देत आमची मागणी पूर्ण न झाल्यास ग्रामस्तरापासुन, तहसील ते दिल्ली पर्यंत आंदोलनाची भुमिका घेण्यात येइल अशी सुचना देण्यात आली.    


 दिल्लीतील जंतर-मंतर येथे गेल्या महिनाभरापासून NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आंदोलन सुरू असून, 20 जुलै रोजी संसद भवनाकडे निघालेल्या मोर्चादरम्यान आंदोलकांवर दिल्ली पोलिसांनी

लाठीचार्ज केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेत अनेक विद्यार्थी व आंदोलक जखमी झाल्याचा दावाही करण्यात आला आहे.

प्रसिद्धीपत्रकात असेही नमूद करण्यात आले आहे की, NEET पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी असून, या प्रकरणात मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि जबाबदार

व्यक्तींनी नैतिक जबाबदारी स्वीकारावी,अशी मागणी संघटनेनी केली आहे.निवेदन देते वेळी सर्व सामाजिक स्तरावर विविध संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते शिक्षक पालक,विधार्थी बहु संखेने उपस्थित होते.

0 Response to "जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांच्या मारहाण, निषेधार्थ तुमसर तहसीलदारनां निवेदन."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article