तुमसर पोलीसांची अवैधरित्या व्यावसायकावर मोठी धाड.
रविवार, 5 जुलाई 2026
Comment
• कोंबिंग ऑपरेशन दरम्यान तुमसर पोलीसांची अवैधरित्या रेती, प्रतीबंधीत सुगंधीत तंबाखु, दारु चा व्यवसाय करणा-यांवर धडक कारवाई.
• एकूण सात लक्ष बारा हजार नऊशे पंच्याऐंशी रु.चा मुद्देमाल जप्त.
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी.
भंडारा/तुमसर :- पोलीस स्टेशन तुमसर येथे दिनांक 04/07/2026 रोजी कोंबींग ऑपरेशन दरम्यान पेट्रोलिंग करित असतांना तुमसर पोलीसांनी विविध अवैध धंद्यावर रेड करुन एकुन 7,12,985/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरच्या कार्यवाही मध्ये तुमसर पोलीस स्टेशन येथील पो.नि. सुभाष बारसे, पो. नि. आघाव सा. तसेच पोलीस उपनिरीक्षक प्रितम येवले, पो.उपनि. मनोहर शहारे, पो.हवा. रामटेके/1570, पो. हवा. ईडपाते/989 पो. शि. बळदे/1365, पो. शि. गिरीपुंजे/362, पो.शि. बावने/1376, पो.शि. दमाहे/83, पो. शि. कांबळे/1120, पो. शि. शेंडे/12, म.पो.शि. कडव/594 यांनी विविध अवैध धंद्यावर कार्यवाही केली ज्यामध्ये
अवैधरित्या रेती वाहतुक
1) अवैधरित्या रेती वाहतुक करतांनी मिळून आल्याने आरोपी चक्रधर कैलास परसमोडे वय 20 वर्ष रा. बोरी ता. तुमसर जि. भंडारा यांचे कडुन एक स्वराज कंपनीचा निळ्या रंगाचा ट्रॅक्टर ज्याचा क्रमांक MH36AR5847 व निळ्या रंगाची ट्राली ज्यात अंदाजे एक ब्रास रेती ज्याचा क्रमांक MH36AL9706 असा एकुन 7,06000/- रु.
अवैधरित्या प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखु..
2) पोउपनि प्रितम येवले पो. स्टे. तुमसर यांनी अवैधरित्या प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखु बाळगुन मिळुन आल्याने आरोपी आशिष केशवराव डबले वय 35 वर्ष रा. तामसवाडी (भेद्रे) ता. तुमसर जि. भंडारा याचे घरी रेड केले असता त्याचे कडुन 1) रिम झीम टीम टोबॅको नं. 1 प्रती 1 किलो प्रमाने एकुन 6 किलो किमती 3300/-रु, 2) आर गोल्ड जी 20 फ्लेवर चेविंग टोबॅको प्रती 1 किलो प्रमाने एकुन 2 किलो किमती 1300/- रु 3) इगल हुक्का शिशा टोबॅको प्रती 40 ग्रॅम किमती 85/-रु 4) सुप्रिम पान पराग पान मसाला प्रती 2 ग्रॅम चे 60 नग एकुन किमती 300/- रु असा एकुन 4985/- रु चा मुद्देमाल डिटेन करण्यात आला पुढील कार्यवाही करिता फुड अँन्ड ड्रग्स डिपार्टमेंट यांना माहीती देण्यात आली आहे.
अवैधरित्या मोहफुलाची दारु विक्री.
3) अवैधरित्या मोहफुलाची दारु विक्री करिता आरोपी सौ. गिता सुरेश गुर्वे वय 65 वर्ष रा. नेहरु वार्ड तुमसर जि. भंडारा ही बाळगुन मिळुन आल्याने हीचेवर दारुबंदी कायद्याअन्वये रेड करुन 10 प्लास्टीक बिसलेरीच्या बॉटलमध्ये प्रत्येकी 1 लिटर प्रमाने एकुन 10 लिटर किमती 2000/- रु ची मिळुन आल्याने जप्त करण्यात आली.
सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक नूरुल हसन सा. पोलीस अधिक्षक भंडारा, अप्पर पोलीस अधिक्षक निलेश मोरे सा. सहाय्यक पोलीस अधिक्षक श्री मयंक माधव सा. तुमसर, पोलीस निरीक्षक श्री सुभाष बारसे, पो.स्टे. तुमसर, पोलीस निरीक्षक श्री बाळासाहेब आघाव पो.स्टे. तुमसर यांचे मार्गदर्शनात पो. उपनि. प्रितम येवले, डी.बी. पथक तुमसर चे पोलीस अमलदार तसेच पो.उपनि. शहारे, पो.हवा. रामटेके /1570, पो. हवा. ईडपाते/989 पो. शि. बळदे/1365, पो. शि. गिरीपुंजे/362, पो.शि. झंझाड/878 पो.शि. बावने/1376, पो.शि. दमाहे/83, पो. शि. कांबळे/1120, पो. शि. शेंडे/12, म.पो.शि. यांनी केली.त्यामुळे अवैधरित्या व्यावसायिकावर धास्तीचे वातावरण निर्माण झाले असून रेती, अवैध,दारू,तंबाखू गुटखा नशा चोरून करणाऱ्या चोरट्या व्यवसायिकावर वचक बसण्याची शक्यता दिसून येते आहे.
0 Response to "तुमसर पोलीसांची अवैधरित्या व्यावसायकावर मोठी धाड."
एक टिप्पणी भेजें