-->
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (राजरत्न आंबेडकर )भंडारा जिल्हा शाखेची सभा विश्राम गृह भंडारा येथे  संपन्न.

दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (राजरत्न आंबेडकर )भंडारा जिल्हा शाखेची सभा विश्राम गृह भंडारा येथे संपन्न.


संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज"

भंडारा विशेष प्रतिनिधी :- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भंडारा जिल्हा शाखेची सभा विश्रामगृह भंडारा येथे ४ जुलै 2026 ला दुपारी१२ वाजता आयोजित करण्यात आली होती. या सभेत बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया जिल्हा शाखेचा विस्तार करून टीबीएसआय व एएम एससी चे कामकाज अधिक सक्षम करण्यासाठी आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय बनसोड अध्यक्ष नागपूर विभाग होते. तर मार्गदर्शक म्हणून बुधाजी वाढविंदे राज्याध्यक्ष, हेमंत जाधव राज्य महासचिव, नरेंद्र चहांदे राज्य कार्यक्रम समन्वयक ,आकाश चौरे विभागीय मुख्य संघटक उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी भारतीय बौद्ध महासभा चे विस्तार तसेच बँकेचे शेअर कसे घ्यावे व का घ्यावे याबद्दल छान माहिती दिली व येणाऱ्या डिसेंबर 2026 पर्यंत भंडारा जिल्ह्यात एक बँक शाखा स्थापन करण्यात यावी असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन डॉ. प्रवीण थुलकर जिल्हाध्यक्ष, तथागत फुले तालुका महासचिव यांनी केले होते. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा महासचिव मनोज बनसोड यांनी केले. तर आभार महिला उपाध्यक्ष शालुताई तिरपुडे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्याकरता इंजिनीयर रूपचंद रामटेके, सुदेश वैद्य ,राजविलास गजभिये, दीपक जनबंधू, सतीशकुमार नागदेवे, पत्रकार संजीव भांबोरे ,आम्रपाली गजभिये ,विजय नंदागवळी, केवल नागदेवे, सुदर्शन ताई वैद्य, छायाताई नंदा गवळी ,राजेश मडामे, उमेश मेश्राम ,डॉ सुनील जीवनतारे तसेच तुमसर, साकोली येथील बौद्ध उपासक-उपासिका व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Response to "दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (राजरत्न आंबेडकर )भंडारा जिल्हा शाखेची सभा विश्राम गृह भंडारा येथे संपन्न."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article