-->
सेवापूर्ती निमित्त सहाय्यक शिक्षक देवानंद पाटील यांचा सत्कार.

सेवापूर्ती निमित्त सहाय्यक शिक्षक देवानंद पाटील यांचा सत्कार.



       अविनाश गोंडाणे 
"साप्ताहिक जनता की आवाज"
 
अमरावती (वि.प्र.) :- सुरेशबाबा विद्यालय फुबगाव येथे शिक्षक म्हणून रुजू झालेले देवानंद भजनदास पाटील यांच्या सेवापूर्ती निमित्त सेवापूर्ती सत्कार समारंभाचे आयोजन यश पॅलेस,अमरावती येथे करण्यात आले होते. समारंभ अध्यक्ष एस. यू.फुलझेले सर हे होते.प्रमुख अतिथी म्हणून प्रा.जगदीश गोवर्धन,अनिल वानखडे, प्रा.सीमाताई मेश्राम यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष फुलझेले म्हणाले,आंबेडकरी चळवळ ही चळवळीत वाहून घेणाऱ्या प्रामाणिक,निष्ठावंत कार्यकर्त्यांमुळे गतिशील होत आहे.देवानंद पाटील याला अपवाद नाहीत.ते सेवानिवृत्ती नंतर चळवळीसाठी अधिक जोमाने काम करतील हा आशावाद बाळगायला हरकत नाही असे ते म्हणाले.प्रमुख अतिथी प्रा.जगदीश गोवर्धन,अनिल वानखडे, प्रा. सीमाताई मेश्राम यांनी याप्रसंगी देवानंद पाटील यांच्या कार्यावर ओझरता प्रकाश टाकला.आपले मनोगत व्यक्त करतांना देवानंद पाटील म्हणाले, बुद्ध,फुले, शाहू, आंबेडकरी विचाराची प्रेरणा घेत,मानवतावादी विचाराचा प्रचार,प्रसार पुढे सुरूच राहील तसेच शब्दास्त्र विचार मंच द्वारा परिवर्तनवादी आंबेडकरी साहित्य संमेलनाचा संयोजक म्हणून नव्या पिढीला साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आंबेडकरी प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करेल असे मनोगतातून आपले विचार व्यक्त केले.यावेळी परिवर्तनवादी आंबेडकरी साहित्य संमेलनाचे मुख्य संयोजक,शब्दास्त्र प्रमुख प्रवीण कांबळे,संयोजक विद्रोही अविनाश गोंडाणे,पद्माकर मांडवधरे,सिद्धार्थ गोंडाणे,अनिल पाटील यांनी सेवापूर्ती निमित्त देवानंद पाटील यांचा सपत्नीक सन्मान केला तसेच कार्यक्रमाला उपस्थितांनी देखील त्यांचा सन्मान करीत पुढील वाटचालीस शुभेछ्या दिल्या.प्रास्ताविक प्रशांत भोयर यांनी मांडले.संचालन अरुण भोयर यांनी केले तर आभार शशांक पाटील यांनी मानले. कार्यक्रमाला गणमान्य व्यक्तीसह मोठ्या संख्येने लोकांची उपस्थिती होती.

0 Response to "सेवापूर्ती निमित्त सहाय्यक शिक्षक देवानंद पाटील यांचा सत्कार."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article