७ जुलैला वैनगंगा नदीत आत्मदहन करू,जिल्ह्यातील ३ रुग्णवाहिका वाहन चालकांचे प्रशासनाला पत्र.
गुरुवार, 2 जुलाई 2026
Comment
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- जिल्ह्यातील १०२ रुग्णवाहिका वाहन चालकांना समान काम समान वेतन या तत्त्वावर उच्च न्यायालयाचे आदेशाप्रमाणे 14 वाहन चालकांना ज्याप्रमाणे 31 हजार 242 मानधन मिळते त्याचप्रमाणे अन्य तीन वाहन चालकांना सुद्धा 31 हजार 242 मानधन देण्यात यावे या मागणी करिता संघटनेच्या वतीने ३० जून 2026 ला जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद भंडारा मार्फत आयुक्त तथा संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांना निवेदन देण्यात आले .याबाबत सविस्तर माहिती १५ते २० वर्षापासून शासकीय वाहनावर विविध कार्य प्रणाली द्वारे अल्पशा मानधनावर २४ तास अहोरात्र आरोग्य संस्थेत कर्तव्य बजावत आहेत. परंतु शासन व प्रशासनाने दुर्लक्ष केलेले आहे. यापूर्वी शासन प्रशासनाला मागण्या संदर्भात अनेक निवेदन दिले परंतु सदर निवेदनावर कोणते प्रकारची दखल घेण्यात आलेली नाही . शासनाने दिलेल्या आश्वासनुसार न्यायालयात सदर ३ वाहन चालक गेले नाहीत. 14 वाहन चालकांना न्याय मिळाला. परंतु जिल्ह्यातील ३ वाहन चालकांना न्याय मिळालेला नाही. समजा सदर वाहन चालकांना न्याय मिळाला नाही तर ७ जुलै 2026 रोज मंगळवार ला वैनगंगा नदी भंडारा येथे जलसमाधी घेऊन आत्महत्या करण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची असेल अश्या प्रकारचे निवेदन संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी भंडारा, जिल्हा पोलीस अधीक्षक भंडारा, मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारा, जिल्हा आरोग्य अधिकारी भंडारा ,जिल्हा चिकित्सक भंडारा, ठाणेदार पोलीस स्टेशन भंडारा ,ठाणेदार पोलीस स्टेशन कारधा यांना देण्यात आले. निवेदन देताना जितेंद्र डोंगरे ,ज्ञानेश्वर देशकर ,राजू डोंगरवार यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
0 Response to "७ जुलैला वैनगंगा नदीत आत्मदहन करू,जिल्ह्यातील ३ रुग्णवाहिका वाहन चालकांचे प्रशासनाला पत्र."
एक टिप्पणी भेजें