-->
तुमसर शारदा विद्यालयात डाक जीवन विमा व बचत योजनांबाबत मार्गदर्श.

तुमसर शारदा विद्यालयात डाक जीवन विमा व बचत योजनांबाबत मार्गदर्श.


दिगंबर देशभ्रतार 
"साप्ताहिक जनता की आवाज" 
 
तुमसर, प्रतिनिधी :- भारतीय डाक विभागाच्या वतीने शारदा विद्यालय व कन्या कनिष्ठ महाविद्यालय, बजाजनगर, तुमसर येथे डाक जीवन विमा (PLI), ग्रामीण डाक जीवन विमा (RPLI) तसेच विविध बचत योजनांविषयी जनजागृतीपर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी तुमसर पोस्ट ऑफिसचे पोस्टमास्तर श्री. अनिल कटरे यांनी विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांना भारतीय डाक विभागाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. त्यांनी डाक जीवन विम्याचे कमी प्रीमियम, अधिक बोनस, आर्थिक सुरक्षितता तसेच सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), सुकन्या समृद्धी योजना, मुदत ठेव, आवर्ती ठेव यांसारख्या बचत योजनांचे महत्त्व स्पष्ट केले. नियमित बचत ही प्रत्येकाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक असून, आर्थिक शिस्तीची सवय लहानपणापासूनच लागावी, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमास शाळेचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी विविध योजनांबाबत प्रश्न विचारून शंकांचे निरसन करून घेतले.

कार्यक्रमाच्या शेवटी शारदा विद्यालयाचे प्राचार्य राहुल डोंगरे यांनी भारतीय डाक विभागाचे व पोस्टमास्तर श्री. अनिल कटरे यांचे विद्यार्थ्यांना उपयुक्त व मार्गदर्शक माहिती दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार मानले. अशा उपक्रमांमुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये बचतीची सवय निर्माण होण्यास व आर्थिक साक्षरता वाढण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

0 Response to "तुमसर शारदा विद्यालयात डाक जीवन विमा व बचत योजनांबाबत मार्गदर्श."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article