-->
अंगणवाडी आहार पुरवठा संघटना ( CITU ) भंडारा तर्फे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांना देण्यात आले निवेदन.

अंगणवाडी आहार पुरवठा संघटना ( CITU ) भंडारा तर्फे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांना देण्यात आले निवेदन.


 • अंगणवाडी आहारासाठी तात्काळ गॅस उपलब्ध करून देणे.
• वाढत्या महागाईनुसार आहाराचा प्रति लाभार्थी दरात वाढ करण्यात यावी.

.             निवेदन स्वीकारतांना खा.प्रशांत पडोळे

          संजीव भांबोरे
 "साप्ताहिक जनता की आवाज" 

भंडारा :- एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे मुख्य उद्दिष्ट कुपोषणमुक्त महाराष्ट्र निर्माण करणे हे आहे.
या उद्दिष्टपूर्तीत अंगणवाडीतील ताजा सकस आहार अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असून हा आहार तयार व पुरवठा करणाऱ्या महिला बचत गटांचे योगदानही अत्यंत महत्वाचे आहे.
सध्या राज्यात प्रचंड महागाई वाढलेली आहे. डाळी, तेल, गॅस, भाजीपाला, धान्य तसेच इतर जीवनावश्यक वस्तूचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यातच युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्व भूमीवर गॅसचा तुटवडा निर्माण होत असून महिला बचत गटांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेक दठकाणी आपल्या कार्यालयाने काढलेल्या पत्राना गॅस एजन्सीकडून मान्यता दिली जात नाही.
लहान बालकांना ताजा व शिजवलेल्या गरम आहार नियमित मिळण्यात कोणताही खंड पडू नये यासाठी मुलांच्या आहाराला प्राधान्य देऊन आहार पुरवठादार गटांना तत्काळ गॅस उपलब्ध करून देण्याचे आदेश सर्व गॅस एजन्सींना देण्यात यावे. गॅस वेळेवर उपलब्ध होत नसल्यामूळे आहार
शिजवण्यासाठी मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.
२०१३ पासून असलेल्या अत्यल्प दरामध्ये आजच्या महागाईत आहार पुरवठा करणे अत्यंत कठीण बनले आहे. महिला बचत गटांना कर्ज काढून काम करावे लागत आहे. अनेक वेळा स्वतःचे दागिने 
गहाण ठेवून आहार पुरिठा सुरू ठेवावा लागत आहे. तरी शासनाने या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेणे आवश्यक आहे.
अंगणवाडी आहार पुरिठा हा व्यावसायिक नफ्यासाठी नसून सामाजिक बांधिलकीतून केले जाणारे काम आहे. परंतू वाढत्या खर्चामुळे महिला बचत गट आर्थिक संकटात सापडले आहेत. केंद्र शासनाकडून दरवाढीबाबत अत्यंत उदासीनता दिसून येत आहे. युद्धजन्य परिस्थितीत गॅस तुटवडा व महागाई यामुळे ग्रामीण भागातील आहार शिजवणाऱ्या महिलांना मोठ्या अडचणींचा
सामना करावा लागत आहे. इंधनासाठी मिळणारे अत्यल्प मानधन अनेकदा दोन-दोन वर्ष मिळत नाही. अश्या परिस्थितीत स्वतःच्या खिश्यातून इंधन खरेदी करावे लागत आहे. कमी मोबदला व तोही वेळेवर न मिळाल्याने परिस्थिती अधिक गंभीर होत आहे.
*तरी शासनाने खालील मागण्या तातडीने मान्य कराव्यात*
1. अंगणवाडी आहारासाठी आवश्यक गॅस सिलिंडरचा तत्काळ व नियमित पुरवठा करावा.
2. गॅस तुटवडा टाळण्यासाठी सर्व जिल्हाधिकार्यान मार्फत गॅस एजन्सींना तातडीचे आदेश देण्यात यावे.
3. वाढत्या महागाई नुसार आहाराचे दर तत्काळ वाढवून कुपोषित बालके, स्तनदा माता व गरोदर मातांसाठी प्रती लाभार्थी २६ रुपये व सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी २४
रुपये मंजूर करण्यात यावे.
4. तांदूळ व गहू प्रमाणे डाळी,मटकी , गूळ इत्यादी वस्तू शासनाने उपलब्ध करून द्याव्यात.
5. महिला बचत गटांना आर्थिक संकटातून दिलासा देण्यासाठी आगाऊ रक्कम व विशेष अनुदान देण्यात यावे.
6. अंगणवाडी इंधन व आहाराचे बिल दरमाह नियमित पणे अदा करण्यात यावे.
7. अंगणवाडी आहार बनवण्यासाठी तेल, डाळी स्वस्त दरात उपलब्ध करून द्याव्यात तसेच गॅस प्राधान्याने मिळेल यासाठी तसे संबंधित विभागाला आदेश देण्यात यावे.

सर्व लाभार्थ्यांना ताजा शिजवलेल्या सकस आहार नीयमितपणे सुरू राहील तसेच आहाराच्या दर्जावर परिणाम होणार नाही याची शासनाने खबरदारी घ्यावी. संबंधित अधिकाऱ्यांना तश्या सूचना देण्यात याव्यात.
अंगणवाडीतील बालके, कुपोषित बालके, गरोदर माता व स्तनदा मातांचे पोषण तसेच आहार तयार करणाऱ्या महिला बचत गटांचे अडचणी व गांभीर्य लक्षात घेऊन वरील मागण्यांवर योग्य निर्णय घेण्यात यावा. या सर्व रास्त मागण्या शासन दरबारी लावून तत्काळ निकाली काढाव्या असे लेखी निवेदन भंडारा गोंदिया जिल्ह्याचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांना अंगणवाडी आहार पुरवठा संघटना भंडारा तर्फे देण्यात आले यावेळी संघटनेचे जिल्हा मार्गदर्शक नरेंद्र रामटेके,ज्योती भानारकर,राजकुमारी पैगवार,अल्का लांजेवार,अंतकला बावणकुळे,लक्ष्मी केरझरकर,मीनाक्षी कोहाट,उमा कटकवार,नूतन कुरंजेकर,विद्या थोटे,रविकांत चटप आदी पदाधिकारी व संघटनेच्या सदस्य उपस्थित होते…..

0 Response to "अंगणवाडी आहार पुरवठा संघटना ( CITU ) भंडारा तर्फे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांना देण्यात आले निवेदन."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article