-->
 
११ जुलै जागतिक लोकसंख्या दिन

    जागतिक लोकसंख्या दिनाची सुरुवात संयुक्त राष्ट्र संघाने १९८९ मध्ये केली,कारण दि.११ जुलै १९८७ रोजी जगाची लोकसंख्या ५ अब्ज झाली होती. लोकसंख्येच्या मुद्द्यांवर लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा मुख्य हेतू लोकसंख्या दिनाचा आहे.हा दिवस वाढत्या लोकसंख्येच्या आव्हानांकडे जगाचे लक्ष वेधून घेणारा आहे. मानवी हक्क,गरिबी आणि लिंग समानतेवर यात चर्चा होत असते.
         वाढत्या लोकसंख्येमुळे अन्न,पाणी आणि जमिनीची कमतरता भासत आहे. नोकऱ्यांच्या मर्यादित संधींमुळे बेरोजगारीची समस्या वाढत आहे.लोकसंख्या वाढीचा थेट परिणाम गरिबी वाढण्यावर होतो.लोकसंख्या वाढल्याने कचरा आणि प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढते.घरांसाठी आणि शेतीसाठी मोठ्या प्रमाणात जंगले तोडली जात आहेत.आरोग्य यंत्रणेवर लोकसंख्येचा प्रचंड भार पडतो. मर्यादित संसाधनांमुळे सर्वांना दर्जेदार शिक्षण देणे कठीण होते.शहरांवर लोकसंख्येचा ताण वाढून झोपडपट्ट्यांची संख्या वाढत आहे.श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी अधिक रुंदावत चालली आहे.  
       लोकसंख्या नियंत्रणासाठी कुटुंब नियोजन हा अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे. सुशिक्षित महिला कुटुंब नियोजनाचे महत्त्व अधिक चांगल्या प्रकारे समजतात. माता आणि बाल आरोग्य सुधारणे हे लोकसंख्या नियंत्रणासाठी गरजेचे आहे.महिलांना निर्णय प्रक्रियेत समान हक्क मिळणे आवश्यक आहे.ग्रामीण भागात कुटुंब नियोजनाच्या साधनांची माहिती पोहोचवणे गरजेचे आहे.कमी वयात होणारे बालविवाह थांबविणे आवश्यक आहे त्यामुळे लोकसंख्या नियंत्रणास मदत होईल.'छोटा परिवार, सुखी परिवार' हा संदेश प्रत्येकाने आत्मसात केला पाहिजे.लोकसंख्या नियंत्रणाच्या मोहिमेत तरुणांची भूमिका महत्त्वाची आहे. उपलब्ध संसाधनांचा वापर योग्य आणि काळजीपूर्वक केला पाहिजे.
       लोकसंख्या नियंत्रणासाठी कायद्यांची योग्य अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. प्रोत्साहनपर योजना राबवून लोकसंख्या नियंत्रणात आणता येईल.देशातील साक्षरतेचे प्रमाण वाढवणे हा यावरील कायमस्वरूपी तोडगा आहे.सर्व देशांनी एकत्र येऊन या समस्येवर कार्य करून जागृती करणे आवश्यक आहे. लोकसंख्या आणि निसर्ग यांच्यात समतोल राखणे ही काळाची गरज आहे.या दिवशी लोकसंख्या नियंत्रणासाठी स्वतःपासून सुरुवात करण्याचा संकल्प करणे आवश्यक आहे.
          जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त जनजागृती निर्माण करण्यासाठी छोटा परिवार - सुखी परिवार,लोकसंख्या नियंत्रण - देशाचे प्रगतीकरण, कमी अपत्य - सुखी जीवनाचे सत्य,लोकसंख्या कमी - विकासाची हमी,लोकसंख्या मर्यादित - देश समृद्धित, लोकसंख्या वाढली - प्रगती खुंटली,स्वतःपासून सुरुवात करू या - लोकसंख्या नियंत्रित करू या.साक्षरतेचा प्रसार करू - लोकसंख्या कमी करू,चला एकत्र येऊ या - लोकसंख्या आटोक्यात आणू या. अशा घोषणा देता येईल.तसेच शालेय निबंधासाठी,भित्तीपत्रकासाठी, रॅलीसाठी वापरून जागतिक लोकसंख्या दिनी जनजागृती केली जाते.अशी जनजागृती करून लोकसंख्या नियंत्रित करू या.


                शिक्षणभूषण पुरस्कार प्राप्त
                            साहित्यिक
.                अमरावती.८०८७७४८६०९

0 Response to " "

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article