महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका /समाजसेविका नीलकमल दिलीप कुमार गोंडाने यांना " डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल फेलोशिप अवार्ड -2026 दिल्ली येथे जाहीर.
रविवार, 9 अगस्त 2026
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज
भंडारा/मोहाडी :- तालुक्यातील आंधळगाव येथील बुद्ध फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या बुलंद आवाज, महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका तथा समाजसेविका नीलकमल दिलीप कुमार गोंडाने
यांच्या सामाजिक, कला, क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन " डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल फेलोशीप अवार्ड -2026 दिल्ली नुकताच जाहीर करण्यात आला आहे. सदर कार्यक्रम दिल्ली येथे १२ डिसेंबर 13 डिसेंबर 2026 रोजी आयोजित अकादमीच्या 42 व्या राष्ट्रीय अधिवेशनात पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक - डॉक्टर एस पी सुमन अक्षर, भारतीय दलित साहित्य अकादमी दिल्ली यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. साहित्यिक गझलकार मधु बावलकर यांनी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
0 Response to "महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका /समाजसेविका नीलकमल दिलीप कुमार गोंडाने यांना " डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल फेलोशिप अवार्ड -2026 दिल्ली येथे जाहीर."
एक टिप्पणी भेजें