भारतीय स्वातंत्रदिनाच्या 80व्या वर्धापन सोहळा.
गुरुवार, 27 अगस्त 2026
Comment
नागपूर विभागीय विशेष प्रतिनिधी
प्रदीप कडबे.
"साप्ताहिक जनता की आवाज"
रामटेक :- 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिना निमित्त आकाशझेप फॉउंडेशन द्वारे संचालित महा रक्तदान शिबिराला तारांगण महिला कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था,मनाम दुकानदार संघ यांच्या संयुक्त विधमाने रियान मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल येथे समाजाच्या हितासाठी पुढाकार घेऊन रक्तदान, अवयव दान, देहादानाच्या शिबिराला पाठबळ देण्यात आलेत..
आकाशझेप फॉउंडेशन चे प्रमुख साक्षोधन कडबे, तसेच तारांगण महिला संस्था यांच्या मार्गदर्शनात 29 लोकांनी रक्तदान केलं.
यावेळी डॉ. प्रदीप बोरकर संचालक रियान हॉस्पिटल, डॉ. वैशाली बोरकर, साक्षोधन कडबे,डॉ. सुनील आसटकर,नरेंद्र सहारे, भीमशाहीर /पत्रकार प्रदीप कडबे, ममता राळे,रिषी राळे.. व इतर मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते..
समाज जागृतीसाठी या पुढेही जास्तीत जास्त लोकांना रक्तदान, अवयव, देहादाना बद्दल आम्ही कटीबद्ध राहून अशी प्रण घेण्यात आली. याप्रसंगी याप्रसंगी सपना सांगोळे, अनिता जानबंधु,सोनम वासनिक, वनमाला साखरे, आशा राऊत, दर्शना राऊत, मंदा राऊत, उलझा ढवळे, किरण टेभुणे, भोजवान सहारे, शुभम जन बंधू, पीपलव्ह राळे, इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Response to "भारतीय स्वातंत्रदिनाच्या 80व्या वर्धापन सोहळा."
एक टिप्पणी भेजें