-->
साहित्यिक व कलावंत निवड समिती बरखास्त करा- श्रीकांत नागदेवे.

साहित्यिक व कलावंत निवड समिती बरखास्त करा- श्रीकांत नागदेवे.



• ३ दिवसांपासून बेमुदत आमरण आंदोलन सुरू...

          युगांतर बारसागडे 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

भंडारा :- जिल्ह्यात नव्याने तयार करण्यात आलेली राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलावंत निवड समिती बरखास्त करणे. व इतर मागण्यांच्या संदर्भात अमर कला सांस्कृतिक संघटना व कलावंतांचे ३ दिवसांपासून बेमुदत आमरण आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील त्रिमूर्ती चौकात सूरू आहे. 
           अमर कला सांस्कृतिक संघटनेचे कलावंतांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले आहे की, जिल्ह्यात नव्याने राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलावंत निवड समिती तयार करण्यात आलेली आहे. परंतु या निवड झालेल्या समिती मध्ये एकही सदस्य कलावंत नाहीत. निवड झालेले सदस्य हे कुठल्याही कला मंचाचे कलावंत नाहीत तर हे काय वृद्ध कलावंतांच्या हिताचे निर्णय घेतील.
 
      भंडारा जिल्हा हा कलावंताचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात सर्वस्तरीय कलाकार आढळतात. त्यामुळेच वृद्ध कलावंताची या ठिकाणी निवड झाली पाहिजे. या निवड समितीमध्ये जेष्ठ व तज्ञ लोक कलावंताना या निवड समितीमध्ये स्थान मिळायला पाहिजे. जेणेकरून हे खऱ्या वृद्ध कलावंताना निवडून त्यांना न्याय देतील.

         पण या ठिकाणी कलावंत कमी व राजकीय लोकांचा प्रचंड प्रमाणात भरणा असल्यामुळे हे लोक बोगस कलावंतांची आर्थिक देवाण- घेवाण करीत असतात. असा प्रकार जिल्ह्यात घडलेला आहे. ह्या समितीमध्ये पुन्हा दोन सदस्यांची नियुक्ती झालेली आहे की, त्यांनी मागील वेळी आर्थिक व्यवहार करून बोगस कलावंतांची निवड केलेली आहे. अशा भ्रष्टाचारी व्यक्तींना या समितीमध्ये निवड करणे योग्य नाही. त्यामुळे जिल्ह्यातील गरजू व खरे कलावंत या योजनेपासून वंचित राहतील. मागील वेळी या सदर विषयाचे निवेदन व सखोल चर्चा सुद्धा केलेली असून सुद्धा पुन्हा जिल्ह्यात तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे.

         जर कलावंताच्या मानधन योजनेत होणारा भ्रष्टाचार थांबवायचा असेल तर नव्याने स्थापन झालेली समिती बरखास्त करावी लागेल व जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील तज्ञ कलावंत लोकांची नियुक्ती १० दिवसांच्या आत करण्यात यावी. व नव्याने निवड समिती तयार करण्यात यावी. जिल्ह्यात नव्याने तयार करण्यात आलेली राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलावंत निवड समिती बरखास्त करणे. निवड झालेले सदस्य कलाकार आहेत की नाही याची चाचणी करणे. प्रलंबित असलेली सन २०२५ ते २०२६ ची मिटिंग घेण्यात येऊ नये. इत्यादी मागण्यांच्या संदर्भात बेमुदत आमरण आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील त्रिमूर्ती चौकात सूरू आहे.
 
        या बेमुदत आमरण आंदोलनात अमर कला सांस्कृतिक संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत नागदेवे, गणेश आथीलकर, शाहिर अंबादास नागदेवे, सुबोध कान्हेकर, परमानंद मेश्राम, मनोज खोब्रागडे, संजय नागदेवे, राजेंद्र लांजेवार, मुरलीधर खोब्रागडे, सुभम लांजेवार, हिराचंद डहाट, गंगाधर धोतरे, अश्वजित नंदेश्वर, श्रीकृष्ण शेंडे, ओमकार आजंकर, राकेश राहुलकर, राजू गजभिये, आर्यन नागदेवे, मुकेश पुडके, नाशिक चवळे, अचल मेश्राम, युगांतर बारसागडे  सहभागी आहेत. 

         या मागणीचे निवेदन पालकमंत्री पंकज भोयर, मुख्य कार्यपालन अधिकारी ग्रा.पं. विभाग तथा सचिव राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक कलावंत मानधन सन्मान योजना, सांस्कृतिक मंत्री, सांस्कृतिक कार्य संचनालय, नागपूर यांना देण्यात आले आहे.

0 Response to "साहित्यिक व कलावंत निवड समिती बरखास्त करा- श्रीकांत नागदेवे."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article