दलित, शोषित ,पिढीत,वंचित, कामगार ,कष्टकरी यांचा आवाज म्हणजे अण्णाभाऊ साठे- पत्रकार संजीव भांबोरे.
मंगलवार, 4 अगस्त 2026
Comment
• पहेला येथे अण्णाभाऊ साठे यांच्या 106 जयंतीनिमित्त मार्गदर्शन
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :-- तालुक्यातील पहेला येथे लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार तथा जिल्हा अशासकीय सदस्य संजीव भांबोरे उपस्थित होते. तर उद्घाटक म्हणून माजी सरपंच मंगला ठवकर उपस्थित होत्या. विशेषअतिथी म्हणून माजी सरपंच सुनील शेंडे ,घनश्याम खराबे, राजेश मेश्राम ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
यावेळी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत अण्णाभाऊ साठे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर,क्रांतिकारी लहुजी साळवे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना संजीव भांबोरे म्हणाले की, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लोककलेच्या माध्यमातून येथील दलित, शोषित ,वंचित, कामगार ,कष्टकरी यांच्या व्यथा आणि वेदना आपल्या शाहिरीच्या माध्यमातून जनतेपर्यंत मांडण्याचे काम त्यांनी केले व लोकांना त्यांच्या अधिकाराप्रती जागृत राहण्याचे काम त्यांनी पोवाडे, लावणीच्या माध्यमातून केले. त्यांनी फकीरा नावाची कादंबरी लिहिली असून ती कादंबरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित केली.
व या फकीरा कादंबरीत दुष्काळ परिस्थितीत गावातील लोकांना अन्नधान्य व पैशापासून वंचित राहावे लागले होते. अशा वेळेस फकीरा यांनी ब्रिटिश सरकारचे अन्नधान्याचे गोदाम व पैशाची लूट करून ते सर्व गरीब लोकांना वाटून दिले व त्यांचे संपूर्ण वास्तव्य चित्र लोकशाहीरअण्णाभाऊ साठे यांनी फकीरा कादंबरीत साहित्याच्या रूपात लिहिले. यावेळी माजी सरपंच मंगला ठवकर, रोजगार सेवक आशा ठवकर, ग्रामपंचायत सदस्य राजेश मेश्राम यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन भाले यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरता कवडू खंडाळे, देवानंद वानखेडे, नाना खंडाळे, पंकज खंडाळे, आयुष शेंडे,संजय शेंडे व सर्व मातंग समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.
0 Response to "दलित, शोषित ,पिढीत,वंचित, कामगार ,कष्टकरी यांचा आवाज म्हणजे अण्णाभाऊ साठे- पत्रकार संजीव भांबोरे."
एक टिप्पणी भेजें