ना. रामदास आठवले यांच्या स्वागत समारंभात कवितांचा वर्षाव.
रविवार, 16 अगस्त 2026
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी
मुंबई दि. :- 15 ऑगस्ट 26 केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री ना. रामदास आठवले साहेब यांच्या मंत्रिपदाची दहा वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मंत्रिपदाची दशकपूर्ती समारंभ यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपाध्यक्ष आण्णा बनसोडे, बीजेपी नेता प्रवीण दरेकर यांनी सत्कारमूर्ती आठवले साहेबावर कवितांचा वर्षाव करून धमाल केली . अध्यक्षस्थानी रिपाईचे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे होते.
मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस म्हणाले की, आठवले साहेब "कोणत्याही संकटात ते दिसतात स्थितप्रज्ञ्, पण साहेब आहेत आमचे राजकीय हवामान तज्ञ् " मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आठवले यांचे व्यक्तिमत्व संघर्षातून घडले आहे. लोकसभेत आठवले बोलायला उभे राहिले की, पंतप्रधानासह विरोधी पक्षनेते सुद्धा लक्ष देऊन त्यांचे भाषण ऐकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अनेक सभा त्यानी गाजवल्या आहेत, असे ही फडणवीस म्हणाले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "बाबासाहेबांचे विचार ज्यांनी साठवले त्यांचे नाव आहे आठवले " ते पुढे म्हणाले की, "आपले नाव रामदास, आपण आहात मोदीजींचे खास " अशी शेरोशाहिरी त्यानी पेश केली. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी "तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे, ही वामनदादा कर्डक यांची कविता सादर केली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, साहेबांची विनोदशैली मनाला भुरळ पाडते. राज्य मंत्रिमंडळात, केंद्रीय मंत्रिमंडळात काम करून त्यांनी तळागाळातील लोकांना न्याय मिळवून दिला.
विधानसभा उपाध्यक्ष आण्णा बनसोडे म्हणाले की, पॅन्थर म्हटला की, पाहिलं नाव येत नामदेव ढसाळ आणि दुसरे नाव येत रामदास आठवले, त्यांचा राजकीय प्रवास प्रदीर्घ आहे. चारोळ्या साठी ते प्रसिद्ध आहेत. भाजपचे नेते प्रवीण दरेकर म्हणाले की, आठवले हे राजकारणातील एक अदभूत रसायन आहे. मी, आर पी आय आणि बीजेपी मधील समन्वयक आहे.
सत्काराला उत्तर देताना रामदास आठवले म्हणाले की, मी ज्यांच्या सोबत जातो त्यांना सत्ता मिळते. समाजाच्या हितासाठी मी सेना भाजप बरोबर गेलो आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदीनी इंदुमिलची जागा बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी दिली.लंडन येथील बाबासाहेब राहत असलेले घर स्मारकासाठी विकत घेतले. लाडक्या बहिणींना 1500/- रुपये मिळतात ते मी वाढवून घेण्यासाठी प्रयत्न करतो आहे.
कार्यक्रमात भन्ते राहुल बोधी, राष्ट्रीय महिला आघाडी अध्यक्षा सिमाताई आठवले, आर पी आय सरचिटणीस अविनाश महातेकर, यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे आणि मुंबई प्रदेश सचिव विवेक पवार यांनी केले. या प्रसंगी, काकासाहेब खंबाळकर, बाबूराव कदम, सुरेश बारशिंग, दयाल बहादुरे आदी. नेते मंडळी उपस्थित होती.
0 Response to "ना. रामदास आठवले यांच्या स्वागत समारंभात कवितांचा वर्षाव."
एक टिप्पणी भेजें