-->
पशु दवाखान्याला महिनाभरापासून कुलूप.

पशु दवाखान्याला महिनाभरापासून कुलूप.


• डॉक्टर नसल्याने पिंपळखुटा येथील पशुपालक हैराण.

गुलाबभाऊ अंभोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज"       

पातूर :- तालुक्यातील पिंपळखुटा येथील पशुवैद्यकीय दवाखान्याला मागील महिनाभरापासून कुलूप असल्याने पशुपालकांची गैरसोय होत आहे. दवाखान्यात डॉक्टर व आवश्यक कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे जनावरांवर वेळेवर उपचार मिळत नसल्याचा आरोप होत आहे.
पिंपळखुटा परिसरात पशुधन असून, गाई, म्हशी, शेळ्या तसेच इतर जनावरांचे पालन करून अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र, जनावर आजारी पडल्यास त्यांना उपचारासाठी दूरच्या ठिकाणी घेऊन जावे लागत आहे. त्यामुळे पशुपालकांना आर्थिक भुर्दंड सहन

कार्यरत असलेल्या डॉक्टरांची बदली झाल्याने त्यांच्या जागी डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली नाही, त्यामुळे डॉक्टर अभावी गेल्या महिनाभरापासून पशु दवाखान्याला कुलूप असल्याने पशुपालकांची गैरसोय होत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन डॉक्टरांची नियुक्ती करण्यात यावी अन्यथा बंद असलेल्या पशु दवाखान्यासमोरच आंदोलन करण्यात येईल. - रवी महानकारवीर भगतसिंग सेना संस्थापक पिंपळखुटा

करावा लागत असून, वेळेवर उपचार न मिळाल्यास जनावरांच्या जीवितालाही धोका निर्माण होऊ शकतो. गावातील पशुवैद्यकीय दवाखानाच बंद असल्याने या योजनांचा लाभ पशुपालकांना कसा मिळणार, असा सवाल उपस्थित होत

आहे. संबंधित विभागाने तातडीने डॉक्टर व कर्मचारी नियुक्त करून दवाखाना नियमित सुरू करावा, अशी मागणी ग्रामस्थ व पशुपालकांनी केली आहे. प्रशासनाने याकडे गांभीयार्ने लक्ष न दिल्यास आंदोलन करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

0 Response to "पशु दवाखान्याला महिनाभरापासून कुलूप."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article