-->
पातुर चानी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक ( खूपिया) महादेवराव देशमुख एसीबीच्या जाळ्यात..

पातुर चानी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक ( खूपिया) महादेवराव देशमुख एसीबीच्या जाळ्यात..

 

  गुलाब भाऊ अंभोरे
"साप्ताहिक जनता की आवाज" 

पातुर :- तालुक्यातील पोलीस स्टेशन चानी येथे अकोला येथील लाच लचपत प्रतिबंधक टीमने उपनिरीक्षक महादेवराव देशमुख यांना ३५ हजारांची लाज घेताना रंग हात पकडले. तक्रारदाराला वाईन बार सुरू करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र ( NOC) साठी तक्रारदाराला चानी पोलीस स्टेशनचे ठाणेदार गंगाधर दराडे आणि महादेवराव देशमुख उपनिरीक्षक यांनी ६५ हजारांची लाच मागितली होती. असे तक्रारकर्त्यांची म्हणणे आहे.

 अशी तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली होती. परंतु ही तोडी फक्त ३५ हजारापर्यंत झाली. ठाणेदार दराडे यांच्या सांगण्यानुसार उपनिरीक्षक महादेव देशमुख लाज घेण्यासाठी गेले होते. परंतु महादेवराव देशमुख यांना जेसीबीच्या घेराव पडला असता त्यांना रंगेहात पकडले. बियर अँड वाईन बार सुरू करण्यासाठी तक्रारदाराने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे अर्ज केला होता. तोच अर्ज पडताळणीसाठी पोलीस स्टेशन चानी येथे (NOC) साठी ठाणेदार गंगाधर दराडे यांनी ६५ आजारांची मागणी केली होती.

त्याच अनुषंगाने तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे या दोघांची तक्रार केली होती.असे तक्रारदाराकडून कळाले. तसेही दराडे साहेबांनी चानी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंद्यांना प्रोत्साहन देऊन त्या लोकांची पाठराखण करीत आहेत. दारूबंदीसाठी महिलांचे कलेक्टर ऑफिसला खूप मोर्चा निघत आहेत चानी पोलीस स्टेशनला खूप निवेदने दिली परंतु याचा असर दराडे साहेबावर पडलेला नाही. उपनिरीक्षक महादेवराव देशमुख यांच्यावर या प्रकरणी एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडून एसीबी चे पथकाने अकोला येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम ७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

0 Response to "पातुर चानी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक ( खूपिया) महादेवराव देशमुख एसीबीच्या जाळ्यात.."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article