वामनच्या जीवन गाण्यात भीम अभिमान होता..
बुधवार, 19 अगस्त 2026
Comment
संकलन
लोकशाहीर प्रदीप कडबे
बुद्ध कबीर फुले शाहू वामनचा प्राण होता ||धृ||
वामन तुझ्या शब्दात अग्निज्वाला बखान होता
सर्व धर्माचा संविधानाचा सन्मान होता
बुद्ध धम्म चळवळीचा प्रज्ञावान गुणवान होता ||१||
गीत गजलाचा सम्राट वामन महाकवी झाला
क्रांतिकारी भीम शाहीर अमरजीवी झाला
भीम कोहिनूर हिरा भारतात महान होता||२||
मराठी मायबोलीच्या त्यांनी गौरव केला
मराठीला दिशा दृष्टी सूत्र नवा आयाम दिला
श्रमण संस्कृती मराठी भाषेचा विद्वान होता ||३||
शोषित वंचिताचा करून बुलंद आवाज
झोपडीत तांड्यात जाऊन जागविला समाज
लोकमान्य कवी जनमानसात बहुमान होता ||४||
नव्हती गाडी बंगला गात गावो गावी फिरला
फकीर अवलिया भिक्षुकाचं त्यागी जीवन जगला
मधु कलावंताची तो आन-बान शान होता ||५||
कवी/गझलकार
मधु बावलकर, तेलंगणा.
0 Response to "वामनच्या जीवन गाण्यात भीम अभिमान होता.."
एक टिप्पणी भेजें