-->
ग्रामसभेत ताणतणावामुळे ग्रामपंचायत अधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू..

ग्रामसभेत ताणतणावामुळे ग्रामपंचायत अधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू..

तुमसर तालुक्यात तीव्र संताप; सर्व ग्रामसभांवर बहिष्काराचा इशारा !

"साप्ताहिक जनता की आवाज"
       वृत्तपत्र प्रतिनिधी 

तुमसर/सिहोरा :- ग्रामसभेदरम्यान शासकीय कर्तव्य बजावत असताना निर्माण झालेल्या तीव्र मानसिक ताणतणाव आणि अमानुष प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत अधिकारी शपी. एन. पाटील यांना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना मौजा शिवरे (ता. पारोळा, जि. जळगाव) येथे घडली. या घटनेमुळे संपूर्ण राज्यभरातील ग्रामपंचायत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष व संतापाची लाट पसरली आहे. या दुर्दैवी

घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणण्यासाठीराज्य संघटनेने १८ ऑगस्ट २०२६ पासून आयोजित सर्व ग्रामसभांवर बहिष्काराचे अस्त्र उपसले आहे.

याच पार्श्वभूमीवर, 'महाराष्ट्र पंचायत समिती तुमसर.

.             संघटनेचे पदाधिकारी निवेदन देतांना. 

राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन (तालुका शाखा तुमसर, जिल्हा भंडारा) च्या वतीने गट विकास अधिकारी (पंचायत समिती, तुमसर) यांना गुरुवारी अधिकृत निवेदन सादर करण्यात आले. यानिवेदनाद्वारे तुमसर तालुक्यातील प्रशासनाला आंदोलनाची स्पष्ट कल्पना देण्यात आली आहे.

सिवरे येथील ग्रामसभेत शासकीय कामकाज सुरू असताना अचानक वाद आणि अत्यंत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. या अमानुष प्रसंगाचा गंभीर ताण आल्यामुळे अधिकारी पी. एन. पाटील यांची प्रकृती खालावली आणित्यांना हृदयविकाराचातीव्र झटका आला. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याने कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तुमसर तालुक्यात ग्रामसभांवर पूर्ण बहिष्कार

राज्य संघटनेच्या आदेशानुसार तुमसरतालुक्यात उद्यापासूनआयोजित करण्यात आलेल्या किंवा ज्यांच्या नोटीस/शेड्युल आधीच जारी करण्यात आले आहेत, अशा सर्व ग्रामसभांवर

ग्रामपंचायत अधिकारी संघटनेतर्फे पूर्णपणे बहिष्कार टाकला जाणार आहे.

संघटनेने संबंधित सरपंचांना या निर्णयाची पूर्वकल्पना दिली असून, ग्रामसभा अनिश्चित काळासाठी स्थगित ठेवण्याची विनंती केली आहे. तरीही एखाद्या ठिकाणी सरपंचांनी जबरदस्तीने ग्रामसभा घेण्याचा निर्णय घेतल्यास, ग्रामपंचायत अधिकारी अशा सभांचे आयोजन, नियोजन किंवा संचालन करणार नाहीत आणि सभेला उपस्थितही राहणार नाहीत, असा इशारा देण्यात आला आहे.

आंदोलनाचा मुख्य उद्देश सुरक्षेची मागणीः हा बहिष्कार ग्रामस्थांच्या विरोधात नसून, कर्तव्यावर असताना कर्मचाऱ्यांना होणारा मानसिक शारीरिक त्रास, वाढता तणाव आणि

सुरक्षेचा अभाव याविरोधात प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पुकारण्यात आलेले आंदोलनात्मक पाऊल आहे. प्रशासकीय कामकाज ठप्प होण्याचा धोका

ग्रामपंचायत अधिकारी हा शासन आणि गावपातळीवरील विविध विकास योजनांमधील अत्यंत महत्त्वाचा आणि मुख्य दुवा असतो. मात्र, अशा जीवघेण्या घटनांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अधिकाऱ्यांच्या या बहिष्कार आंदोलनामुळे तुमसर तालुक्यातील ग्रामसभांचे नियोजन पूर्णपणे कोलमडणार असून, ग्रामीण भागातील प्रशासकीय व विकासात्मक कामकाज ठप्प होण्याचा मोठा धोका निर्माणझाला आहे.

0 Response to "ग्रामसभेत ताणतणावामुळे ग्रामपंचायत अधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू.."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article